ACC Under team india vs pakistan
Sports

India vs Pakistan Match : भारत-पाकिस्तानमध्ये होणार हायव्होल्टेज सामना; तारीख आणि खेळाडूंचीही झाली घोषणा, वाचा सविस्तर

Asian Champions Trophy 2024 : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा हायव्होल्टेज सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीम पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सहभागी होणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या हॉकीच्या १८ सदस्यीय संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत सिंह करणार आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व हरमनप्रीत सिंह करणार आहे. तर उपकर्णधार विवेक सागर प्रसाद करणार आहे. ही स्पर्धा ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तर या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

दिग्गजांना मिळाली विश्रांती

टीम इंडियाचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश यांनी निवृत्ती घेतली आहे. पीआर श्रीजेश यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. हॉकी संघात गोलकीपर म्हणून कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा संघात असणार आहे.

टीममध्ये उपकर्णधार हार्दीक सिंह, मनदीप सिंह, ललित उपाध्याय, शमशेर सिंह आणि गुरजंत सिंह यांना संघात स्थान मिळालेलं नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आरहे. टीम इंडिया ८ सप्टेंबर रोजी चीन संघाला स्पर्धेत सामोरे जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ही जपान, मलेशिया, कोरिया आणि पाकिस्तानला आव्हान देणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताच्या हॉकी संघाचं वेळापत्रक

तारीख विरुद्ध संघ

८ सप्टेंबर - चीन

९ सप्टेंबर - जपान

११ सप्टेंबर - मलेशिया

१२ सप्टेंबर - कोरिया

१४ सप्टेंबर - पाकिस्तान

१६ सप्टेंबर - सेमी फायनल

१७ सप्टेंबर - फायनल

चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

गोलकीपर - कृशन बहादूर , सूरजा करकेरा

डिफेंडर - जरनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह (कर्णधार),जुगराज सिंह, संजय आणि सुमीत

मिडफील्डर - राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उप कर्णधार), मनप्रीत सिंह आणि मोहम्मद राहिल

फॉरवर्ड - अभिषेक सुखजीत सिंह, अराइजीत सिंह हुंडल, उत्तम सिंह( ज्यूनिअर संघाचा कर्णधार) आणि गुरजोत सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT