India's Oldest Athelete: या खेळाडूने वयाच्या 101 व्या वर्षी जिंकले 3 गोल्ड मेडल; वाचा आहे तरी कोण?

Vallabhajosyula Sriramulu, World Masters Athletics: वय फक्त आकडाच हे वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. जागतिक स्तरावर त्यांनी भारतासाठी ३ पदकं जिंकली आहेत.
Vallabhajosyula Sriramulu: या खेळाडूने वयाच्या 101 व्या वर्षी जिंकले 3 गोल्ड मेडल; वाचा आहे तरी कोण?
Vallabhajosyula Sriramulusaam tv
Published On

या जगात दोन प्रकारची लोकं असतात, पहिला प्रकार म्हणजे, आता वय झालंय आता माझं काहीच होऊ शकत नाही असा विचार करणारी लोकं. तर दुसरा प्रकार म्हणजे, वय हा आकडाच आहे हे सिद्ध करुन दाखवणारी लोकं.

एकदा वय झालं की आपलं काहीच होऊ शकत नाही असा विचार करणारी लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. तर काहीतरी करण्याची धमक असेल, तर वयाची शंभरी पार केली असूनही आपण पदक जिंकू शकतो. हे १०१ वर्षांच्या वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Vallabhajosyula Sriramulu: या खेळाडूने वयाच्या 101 व्या वर्षी जिंकले 3 गोल्ड मेडल; वाचा आहे तरी कोण?
Paris Olympics 2024 : पॅरीसमध्ये नीता अंबानींनी केलं मराठमोळ्या अंदाजात खेळाडूंचं स्वागत, PHOTO

स्वीडनमध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. १८ जुलै २०२४ रोजी त्यांनी वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आपला १०१ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर १३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी ३ पदकं जिंकली आहेत. ज्यात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत ११० देशातील ८००० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी १९४४ मध्ये रॉयल इंडियन नेवीमधून आपलं काम सुरु केलं. इंडियन नेवीमध्ये ते नेव्हीगेशन अधिकारी म्हणून कार्यरत होते. १९७६ मध्ये ते रिटायर्ड झाले, त्यानंतरही ४ वर्ष त्यांनी आपलं काम सुरु ठेवलं. आपल्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठीही काम केलं. त्यानंतर ते विशाखापट्टणममध्ये शिफ्ट झाले.

Vallabhajosyula Sriramulu: या खेळाडूने वयाच्या 101 व्या वर्षी जिंकले 3 गोल्ड मेडल; वाचा आहे तरी कोण?
Paris Olympics 2024 स्पर्धेची सांगता! कोणी पटकावली सर्वाधिक पदकं? भारत कितव्या स्थानी?

वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी आतापर्यंत जवळपास १०० पदकं आपल्या नावावर केली आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी ४x१०० मीटर रिले स्पर्धेत चौथ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.

त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये झालेल्या ९०-९५ वर्षांखालील गटात ५, १० आणि २० किलो मीटर चालण्याच्या शर्यतीत ३ सुवर्णपदकं पटकावली होती. त्यानंतर २०१८ मध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली होती. आतापर्यंत वल्लभजोस्युला श्रीरामुलु यांनी १०० पदकं जिंकली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com