India vs Pakistan Final 2025 Dubai Stadium rules and regulations : दुबईच्या स्टेडियममध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा रनसंग्राम होणार आहे. आशिया चषकात तिसऱ्यांदा पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहेत. फायनल सामन्याआधी दुबईतील वातावरण चांगलेच तापलेय. शेक हँड वादामुळे भारत-पाकिस्तान सामन्याकडे क्रीडा जगताच्या नजरा खिळल्या आहेत. सामन्यावेळी खेळाडू अन् चाहत्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आज रात्री ८ वाजता होणार्या सामन्याआधी दुबई स्टेडियमकडून प्रेक्षकांसाठी नियमाली जारी केली आहे.
हाय व्होल्टेज ड्रामा आज रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. त्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळेच या हाय व्होल्टेज फायनल सामन्याआधी दुबई पोलिसांनी भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी नियमावली जारी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी काय करावे, काय करून नये, याबाबतची यादी जारी केली. (What is banned inside Dubai Stadium during India Pakistan final)
सामन्यावेळी कर्मचाऱ्यांना नियमांचे पालक करण्याचा सल्ला दुबई पोलीस आणि स्टेडियमकडून देण्यात आलाय. भारत-पाकिस्तान सामना पाहायला येणाऱ्या प्रत्येक तिकिटधारकांना कमीत कमी ३ तास आधी स्टेडियममध्ये पोहचण्याचा सल्ला दिला आहे. फक्त एकवेळाच प्रवेश दिला जाईल. सामन्यावेळी स्टेडियमच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा प्रवेश मिळणार नाही. पार्किंग फक्त ठरलेल्या जागीच करण्यात यावी. स्टेडिमच्या आतमध्ये झेंडा, बॅनर अथवा फटाके घेऊन जाता येणार नाही. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची यादी पोस्ट करण्यात आली आहे.
स्टेडियममध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास मोठी कारवाई करण्यातयेईल. सामना सुरू असताना खेळपट्टीवर जाणं, निर्बंध असणाऱ्या वस्तू घेऊन जाणे, अपशब्दांचा वापर करणं यासारखे गुन्हे केल्यास १.२ लाख रूपयांपासून ७.२ लाख रूपयांपर्यंतचा आर्थिक दंड होऊ शकतो. गुन्हेगारांना तीन महिन्याचा जेलही होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.