team india twitter
Sports

IND vs NZ Scehdule: केव्हा,कुठे अन् कधी होणार पहिला कसोटी सामना? इथे पाहता येईल फुकटात

India vs New Zealand Test Series Match Details: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand Test Series: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा धुव्वा उडवला. आता भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करताना दिसून येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

ही मालिका भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. दरम्यान जाणून घ्या या मालिकेबद्दल सर्वकाही.

केव्हा आणि कुठे होणार सामने?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना उद्या म्हणजे १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये रंगणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

किती वाजता सुरु होतील सामने?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारे कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी सकाळी ९: ३० वाजता सुरु होतील. तर न्यूझीलंडच्या वेळेनुसार हे सामने संध्याकाळी ५ वाजता सुरु होतील.

कुठे पाहता येतील लाईव्ह?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील सामने स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येतील.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

असे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

न्यूझीलंड- टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), माइकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटी सामन्यासाठी), मार्क चेपमन, डेव्हॉन कॉनवे, मेट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ'रूर्के, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र , मिशेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT