India vs New Zealand Semi Final Saam tv news
Sports

World Cup Semi Final: ठरलं! भारत- न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये भिडणार! केव्हा अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या

India vs New Zealand Semi Final: पाकिस्तानने नाणेफेक गमावताच न्यूझीलंडने वर्ल्डकप सेमीफायनलचं स्थान निश्चित केलं आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ World Cup Semi Final:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना येत्या १५ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

तर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये जाणारा चौथा संघ ठरला आहे. दरम्यान वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना केव्हा आणि कुठे खेळवला जाईल? जाणून घ्या.

पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर..

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्याची सुवर्णसंधी होती. मात्र यासाठी पाकिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची संधी होती. मात्र ही महत्वाची नाणेफेक पाकिस्तानने गमावली.

तर इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण कठीण झालं आहे. इंग्लंडला ५० धावांवर रोखून पाकिस्तानला हे आव्हान २ षटकात पूर्ण करायचं होतं.

तर १०० धावांवर रोखल्यास हे आव्हान २.५ षटकात पूर्ण करायचं होतं. जे अशक्य आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहचणारा चौथा संघ ठरला आहे.

केव्हा आणि कुठे रंगणार सामना..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये रंगणार आहे. म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. (Latest sports updates)

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहेत.२०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर विजय मिळवला होता.

या पराभवामुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न तुटलं होतं. आता भारतीय संघाकडे या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघ ११७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर ५० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT