India vs New Zealand Final Live Score Update: saam tv
Sports

ICC Men T20 World Cup 2026 Final, India vs New Zealand: जसप्रीत बुमराह ठरला 'प्‍लेयर ऑफ द मॅच'

India vs New Zealand Final Live Score Update: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय. दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

Bharat Jadhav

जसप्रीत बुमराह बनला 'प्‍लेयर ऑफ द मॅच'

जसप्रीत बुमराहने भारतासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बुमराहने ४ षटकांत ३.८० च्या इकॉनॉमीने १५ धावा देत ४ बळी घेतले. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहची ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.

भारताचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय, रत्नागिरी जल्लोष

ढोल ताशांच्या गजरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष

फटाक्यांची आतिषबाजी, भारताचा झेंडा घेऊन क्रिकेट प्रेमींचा जल्लोष

रत्नागिरीकरांनी पेढे वाटून केला आनंद साजरा

भारत विश्वविजेता बनला, न्यूझीलंडला हरवले आणि तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून टी२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले. भारताच्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १९ षटकांत सर्व विकेट गमावल्या आणि त्यांना फक्त १५९ धावा करता आल्या.

न्यूझीलंडला शेवटच्या चार षटकांत ११७ धावांची आवश्यकता

न्यूझीलंडला शेवटच्या २४ चेंडूंत विजयासाठी ११७ धावांची आवश्यकता आहे. न्यूझीलंडने १५ षटकांत सहा गडी गमावून १३९ धावा केल्या आहेत. जेमी नीशम आठ आणि सँटनर ३५ धावांवर खेळत आहेत. बुमराह त्याचा तिसरा षटक टाकण्यासाठी आला आहे.

न्यूझीलंडला विजयासाठी न्यूझीलंडने १४ षटकांत १३४ धावांची गरज, ६ विकेट गमावल्या

न्यूझीलंडने १४ षटकांत ६ गडी गमावून १३४ धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी ३६ चेंडूंत १२२ धावांची आवश्यकता आहे. मिशेल सँटनर ३४ आणि नीशम ६ धावांवर खेळत आहेत.

न्यूझीलंडला विजयासाठी ४९ चेंडूत १३८ धावांची गरज, ५ गडी बाद

न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला

न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. आठव्या षटकात हार्दिकने मार्क चॅपमनला बोल्ड केले. चॅपमनला ८ चेंडूत फक्त ३ धावा करता आल्या. नवव्या षटकात वरुण चक्रवर्तीने टिम सेफर्टला बाद केले. त्याने २६ चेंडूत ५२ धावा केल्या. दोन चौकार आणि पाच षटकार मारल्यानंतर सेफर्टचा इशानने झेल घेतला.

 पॉवरप्लेमध्ये न्युझीलंडनं  गमावल्या ४ विकेट 

सहाव्या षटकात बुमराहने फक्त पाच धावा दिल्या. सहा षटकांनंतर, किवी संघाने ४ बाद ५२ धावा केल्या आहेत. टिम सेफर्टनं आपलं अर्धशतक केलंय.

न्युझीलंडला तिसरा धक्का, ग्लेन फिलिप्सचा उडाला त्रिफळा

अक्षर पटेलने ग्लेन फिलिप्सला बाद केले. आपल्या फिरकीच्या जोरावर अक्षरनं त्याची दांडी गुल केली.

अ‍ॅलन पॅव्हेलियनमध्ये परतला 

 अक्षर पटेलने भारताला पहिला ब्रेकथ्रू दिला. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने फिन अ‍ॅलनला तिलक वर्माने झेलबाद केले.

न्युझीलंडला दुसरा धक्का, बुमराहाला मिळाली पहिली विकेट

बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. त्याने रचिनला बाद केलं.

ICC Men T20 World Cup 2026 Final, India vs New Zealand:  हार्दिकची धुलाई

हार्दिकला त्याच्या दुसऱ्या षटकात फटका बसला, त्याने २१ धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर अॅलनने एक धाव घेतली, तर टिम सेफर्टने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारले.

India vs New Zealand Live: पहिल्या षटकात फक्त ४ धावा

अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या षटकात फक्त चार धावा दिल्या. फिन अॅलन तीन चेंडूत तीन धावा काढत आहे. टिम सेफर्टने अद्याप त्याचे खाते उघडलेले नाही. किवीजसमोर २५६ धावांचे लक्ष्य आहे.

भारतानं न्यूझीलंडसमोर ठेवलं २५६ धावांचे लक्ष्य

भारताने अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात एवढी मोठी धावसंख्या गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५ विकेटच्या मोबदल्यात २५५ धावा केल्या. संजू सॅमसनने ८९, अभिषेक शर्माने ५२ आणि इशान किशनने ५४ धावा केल्या. शेवटी, शिवम दुबेने ८ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. टी-२० विश्वचषक नॉकआउट सामन्यांच्या इतिहासातील हा सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी कधीही अंतिम सामन्यात इतक्या धावा झाल्या नव्हत्या.

अखेरच्या षटकात ठोकल्या २४ धावा, न्युझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान 

टीम इंडियाला ५वा धक्का, स्कोअर २२५ धावा

एका षटकात २ विकेट पडल्या, सॅमसन आणि इशान बाद

१६ व्या षटकात फक्त एक धाव आली आणि दोन मोठे विकेट पडल्या. संजू सॅमसन ४६ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. इशान किशन २५ चेंडूत ५४ धावा काढून बाद झाला. १६ षटकांनंतर भारताचा स्कोअर ४ बाद २०४ झाला.

टीम इंडियाने गमावली ४ विकेट, कर्णधार सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद

इशान किशनचे अर्धशतक इशान किशनने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १५ षटकांनंतर भारताची १ बाद २०३ धावा झाल्या आहेत. संजू सॅमसन ४५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांवर खेळत आहे. इशान किशन २४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावांवर खेळत आहे.

संजू सॅमसनचं शतक हुकलं, ८९ धावांवर झेलबाद

भारतीय संघ विक्रमी धावसंख्या बनवण्याच्या वाटेवर, १४ षटकानंतर १९१ धावा

१४ षटकांनंतर भारताचा स्कोअर १९१ आहे. 

संजू सॅमसननं झळकावलं तिसरं अर्धशतक 

India vs New Zealand Live Score Final : अभिषेक शर्मा 52 धावांवर बाद 

भारतीय संघाला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपाने बसला. ८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. टीम इंडियाला ९८ धावांवर हा धक्का बसला. इशान किशन आता फलंदाजीसाठी आला आहे. दुसऱ्या टोकाला संजू सॅमसन २२ चेंडूत ३८ धावा करत खेळत आहे.

India vs New Zealand Live Score: पॉवरप्ले संपला, भारताच्या  ९२ धावा

सहाव्या षटकात जेकब डफीने २० धावा दिल्या. सहा षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमवता बाद ९२ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने फक्त १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने १९ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन १७ चेंडूत ३३ धावांवर आहे.

अभिषेककडून न्युझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, १८ चेंडूत झळकावलं अर्धशतक

संजू आणि अभिषेककडून न्युझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, ३० चेंडूमध्ये टीम इंडियाच्या ७६धावा

लॉकी फर्ग्युसनच्या षटकात आल्या २४ धावा

चौथ्या षटकात लॉकी फर्ग्युसनने २४ धावा दिल्या. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही बाद ५६ झाली आहे. संजू सॅमसन १४ चेंडूत २४ धावांवर खेळतोय. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. अभिषेक शर्मा १० चेंडूत २३ धावांवर खेळत आहे, त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे.

चार षटकानंतर भारताच्या ५६ धावा, अभिषेक आणि सूंज सॅमसनकडून शानदार खेळी

चौकारनंतर लगावला षटकार, अभिषेकची फटकेबाजी सुरू

तीन षटकानंतर भारताने ३३ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मानं फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. सॅमसननं २३ धावा केल्या आहेत तर अभिषेकनं २० धावा केल्या आहेत.

पॉवरप्लेमध्ये भारताची कामगिरी

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मॅट हेन्रीच्या पहिल्याच षटकात संजूने षटकार मारला आणि सात धावा दिल्या. दोन षटकानंतर भारतानं १४ धावा केल्या आहेत.

Ind vs NZ Final :  संजू सॅमसन आणि अभिषेक सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले

संजू सॅमसन आणि अभिषेक सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. स्ट्राईकवर संजू सॅमसन असून पहिला चेंडू गेला.

न्युझीलंडच्या संघाने जिंकली नाणेफेक; टीम इंडियाला फंलदाजीचं आमंत्रण

अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक गमावली. किवी कर्णधार मिशेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने एक बदल केला, तर टीम इंडियाने कोणताही बदल केला नाही.

टी-२० विश्वचषकाचा समारोप समारंभात क्रिकेट चाहत्यांनी धरला ठेका

T20 वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी रोहित शर्मा अहमदाबादमध्ये दाखल

भारत आणि न्युझीलंडचा अंतिम सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा अहमदाबाद येथे दाखल झालाय.

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, सामन्यादरम्यान चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी गेट क्रमांक एक आणि दोनजवळ 'होल्डिंग एरिया' तयार करण्यात आले आहेत.

टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी एमएस धोनीनं गाठलं अहमदाबाद

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अहमदाबादमध्ये पोहोचला.भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना; कोणी घातलं देवाला साकडं तर कुठे विशेष आरती

सामन्यापूर्वी, देशभरात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. भारतीय खेळाडूंचे फोटो देखील मंदिरात ठेवण्यात आले होते.

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडने अजूनपर्यंत एकही टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही

न्यूझीलंडला अद्याप टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. ते फक्त २०२१ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचले होते, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

IND vs NZ Final Live Score: वर्ल्ड कप २०२६मध्ये भारताने आतापर्यंत ७ सामने जिंकलेत

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाने ग्रुपमधील सर्व सामने जिंकलेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होती. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला रोमांचक सामन्यात हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत स्पर्धेत एकूण आठ सामने खेळले आहेत, ज्यात सात जिंकले आहेत.

टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

न्यूझीलंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन एलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच भारत आणि न्युझीलंड आमनेसामने

India vs New Zealand Final Live Score Update: आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ चा आज अंतिम सामना भारत आणि न्युझीलंडमध्ये होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होतोय. दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. भारत गतविजेता आहे, तर न्यूझीलंड त्यांचे पहिले विजेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT