Virat Kohli  Saam Tv
Sports

Ind Vs NZ ODI Serirs: धावांचा पाऊस, जबरदस्त फॉर्म; तरीही 'या' गोलंदाजाने फोडलाय विराटला घाम

भारतीय संघाचा हा जबरदस्त फरफॉरमन्सने सगळीकडून कौतुक होत असतानाच एका बॉलरने मात्र विराटचे टेंन्शन वाढवले आहे.

Gangappa Pujari

Ind Vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली.  सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ १०८ धावांत तंबूत परतला.

या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मायदेशात भारतीय संघाचा (Team India) हा सलग सातवा मालिका विजय ठरला. भारतीय संघाचा हा जबरदस्त फरफॉरमन्सने सगळीकडून कौतुक होत असतानाच एका बॉलरने मात्र विराटचे टेंन्शन वाढवले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रनमशिन विराट कोहली पुन्हा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. विराटने वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध दोन शानदार शतके झळकावली. मागच्या तीन वर्षांपासून विराटची बॅट थंडावली होती. ती आता पुन्हा जबरदस्त फॉर्ममध्ये आली आहे.

परंतु स्पिनर्सविरुद्ध मात्र विराटची बॅट थंडावताना दिसत आहे. या समस्येवर त्याला अजून म्हणावी तशी मात करता आलेली नाही. खासकरुन डावखुऱ्या स्पिनर्ससमोर त्याची कमजोरी उघड दिसत आहे. त्यांच्यासमोर अजूनही विराटच फार काही चालत नाही. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात तो स्पिन बॉलिंगसमोर फेल ठरला.

काय आहे विराटची कमजोरी...

हैदराबादमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती. रोहित आणि शुभमन गिलने संघाला जोरदार सुरूवातही करुन दिली. यावेळी विराटकडे मोठी खेळी करण्याची संधी होती, मात्र न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर मिचेल सँटनर गोलंदाजीला आला.

त्याने स्टम्पच्या लाइनवर फुल लेंथ चेंडू टाकला. कोहलीने (Virat Kohli) चेंडू फ्रंट फुटवर येऊन खेळायला पाहिजे होता. पण त्याने बॅकफुटवर जाऊन डिफेंड केलं. कोहली चेंडूची लाइन चुकला आणि बोल्ड झाला. कोहलीने त्या मॅचमध्ये फक्त 8 रन्स केल्या.

दुसऱ्या सामन्यातही गमावली विकेट...

शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही विराटची अशीच गोची झालेली पाहायला मिळाली. या सामन्यातही विराट पुन्हा एकदा सँटनरच्याच बॉलिंगवर आऊट झाला. यावेळी सँटनरे ऑफ स्टम्पच्या बाहेर कमालीचा चेंडू टाकला. हा फुल लेंथ चेंडू नव्हता. कोहलीने फ्रंट फुटवर येऊन ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकला. लॅथमने कुठलीही चूक न करता, कोहलीच स्टम्पिंग केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Setback : शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात जाणार

Success Story: बाईपण भारी देवा! गृहिणी ते डीएसपी; संसारचा गाडा ओढत स्पर्धा परीक्षेत यश; अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

Shukraditya Rajyog: 9 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; शुक्रादित्य राजयोगामुळे मिळणार पैसा

SCROLL FOR NEXT