Ind vs NZ ODI Series Coach Rahul Dravid Viral Video Saamtv
Sports

Viral Video: मारा, झोडा की आणखी काय! कोच राहुल द्रविड यांना नक्की काय म्हणायचंय? Video पाहा अन् तुम्हीच सांगा..

Coach राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ मात्र सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते चित्र विचित्र हातवारे करताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

Ind vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिकाही खिशात घातली आहे.

विजयानंतर भारतीय खेळाडूंनी चांगलाज जल्लोश केला. यावेळी कोच राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ मात्र सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते चित्र विचित्र हातवारे करताना दिसत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय संघाने न्यूझीलंडवर दुसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर राहुल द्रविड चालत मैदानावर येत होता. कॅमेऱ्याची नजर फक्त त्याच्यावरच होती. द्रविड मैदानावर येताना काही विचित्र हावभाव करत होता. जसे निन्जा किंवा मार्शल आर्ट्स खेळाडू करतात. (Rahul Dravid)

द्रविडला पाहून त्याला काय करायचे, किंवा काय सांगायचे आहे, हे कोणालाच समजले नाही. त्यावेळी हर्षा भोगले समालोचन करत होता. 'आम्हाला या हावभावांचा अर्थ कोणी समजावून सांगेल का?' असे म्हणत त्यानेही कोच राहुल द्रविड यांच्या या हावभावावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. सध्या राहुल द्रविड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ १०८ धावांत तंबूत परतला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मायदेशात भारतीय संघाचा (Team India) हा सलग सातवा मालिका विजय ठरला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भाजप नेते किरीट सोमय्या नाशिकमध्ये दाखल

Raigad Cyber Crime : डिलीटल अरेस्टची भीती दाखवून लुबाडणूक; रायगड पोलिसांनी ११ आरोपींना ठोकल्‍या बेड्या

म्हाताऱ्याचे अश्लील चाळे, बसमध्ये छातीला हात लावला अन्..; तरुणीने रागात नराधमाच्या कानाखाली जाळ काढला

Maharashtra Politics: राजकारणात खलबतं वाढली! राज ठाकरेंचा फडणवीसांना फोन, नेमकी चर्चा काय? पाहा,VIDEO

Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

SCROLL FOR NEXT