Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ; परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय!

गेल्या 40 दिवसात या महामार्गावर अनेक अपघात
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv

Samruddhi Mahamarg News : नागपूर आणि मुंबई या दरम्यान अंतर कमी करण्यासाठी जलद गती असा समृद्धी महामार्ग बनवण्यात आला. मात्र हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाणही वाढला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे आणि अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

Samruddhi Mahamarg
Rohit Sharma: 3 वर्षांपासून एकही शतक नाही! रोहितची बॅट थंड का? स्वतःचं केला खुलासा, म्हणाला; 'मला माहित आहे...'

नागपूर (Nagpur) आणि मुंबई (Mumbai) दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळसोट महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले. तर एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 23 अपघात झाले. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असं चित्र उभं राहिलं.

या अपघातांच्या मालिकामुळे प्रशासनही हादरला असून आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभाग हे अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन रस्त्यावर उतरले आहे. हे अपघात कशामुळे होतात त्याची कारणे काय यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांची संख्या बघता आणि त्याची कारणं बघता आता यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे, वाहन चालकांची जनजागृती करणे यावर परिवहन विभाग भर देत आहे.

Samruddhi Mahamarg
Panvel News: प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

अनेक कारणांमुळे सध्या अपघातांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे आता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांवर जनजागृती करणे टायर फुठून अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर टायर मध्ये नायट्रोजन भरण्याची व्यवस्था करणे. अशा अनेक उपाय योजना आता प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरून परिवहन विभागाचे अधिकारी करत आहेत.

महामार्गाच्या आजूबाजूला कुठेही हॉटेल्स किंवा ढाबा नसल्याने आता अनेक ठिकाणी अनधिकृत रित्या छोटे छोटे फूड स्टॉल आणि टपऱ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला मोठे ट्रक्स आणि वाहने थांबताना दिसत आहे. यामुळे सुद्धा अपघात वाढले आहेत. त्यामुळे परिवहन विभाग पोलीस आणि एमएसआरडीसीने या अनाधिकृत स्टॉल्सवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक ठिकाणी अशा अनधिकृत फुल स्टॉलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता भविष्यात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com