भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी-२० वर्ल्ड कप फायनल होणार.
सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार.
टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रयत्नात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंडचा संघ पहिला टी-२० विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दुसरीकडे टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक फायनल जिंकण्याच्या हेतूनं मैदानात उतरणार आहे. जर भारत जिंकला तर गतविजेता म्हणून सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकणारा तो पहिला संघ बनणार आहे.
या स्पर्धेत दोन्ही संघांनी कमाल कामगिरी केली आहे. पंरतु १९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. अहमदाबादमधील भारताची कामगिरी फारशी प्रभावी नाहीये. दरम्यान जेव्हा जेव्हा आयसीसीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडले आहेत, तेव्हा कोण जिंकले आहे आणि भारताचा रेकॉर्ड काय आहे? हे जाणून घ्या.
भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदा २००० मध्ये आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने आले होते, त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा दोन चेंडू शिल्लक ठेवत चार गडी राखून पराभव केला होता. आयसीसीच्या अंतिम सामन्यात दोन्ही देश एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी सौरव गांगुली टीमचे कर्णधार होता. कर्णधार सौरव गांगुलीने शतक झळकालं होतंस पण टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.
२०२१ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या जेतेपदाच्या लढाईत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पुन्हा न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आयसीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा किवींकडून पराभव होण्याची ही दुसरी वेळ होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. यावेळी भारताने किंवींना पराभूत करत पराभवाचा कलंक पुसला.
आज टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी आहे. भारताने आतापर्यंत दोनदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. जर टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात असे करणारा भारत पहिला संघ बनेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.