Ind Vs NZ 1st T20
Ind Vs NZ 1st T20 Saamtv
क्रीडा | IPL

IND Vs NZ T20 Series: न्यूझीलंडला T20 मध्ये धूळ चारण्यास हार्दिक सेना सज्ज; 'हे' पाच खेळाडू करणार मोठा धमाका

Gangappa Pujari

Ind Vs NZ 1st T20: न्यूझीलंडच्या संघाला एकदिवसीय मालिकेत ३-० ने धूळ चारली. यानंतर आता भारतीय संघ टी ट्वेंटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आज ( २७, जानेवारी) रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना रंगणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता रांचीमध्ये हा सामना रंगणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आणि मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्यासह (Hardik Pandya) शुभमन गिल, सुर्यकूमार यादव, कुलदिप यादव आणि उमरान मलिक या पाच खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६० धावा कुटल्या. ज्यामध्ये पहिल्या सामन्यातील एक द्विशतक आणि शेवटच्या सामन्यातील वादळी शतकाचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिकेतील हाच फॉर्म शुभमन गिलला कायम ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्या जोडीला टी ट्वेंटीचा घातक फलंदाज सुर्यकूमार यादवच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. सुर्याने अलिकडेच श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकले होते. त्यामुळे असाच धमाका न्यूझीलंडविरुद्ध करण्यासाठी तो सज्ज असेल.

मधल्या फळीतील फलंदाजी सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्याकडे असणार आहे. त्याचबरोबर गोलंदाजीची कमानही त्याच्याकडे असेल. गोलंदाजीत कुलदिप यादव आणि उमरान मलिक धमाका करतील.

टी ट्वेंटी सामन्यांसाठी असे असतील दोन्ही संघ-

भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार. (Indian Cricket Team)

न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (क), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपली, ईश सोधी, ब्लेअर टिकनर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राजकारण माझ्यासाठी नवं नाही, चंद्रहार पाटील सांगलीतून गरजले

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT