Arshdeep Singh no ball issue SAAM TV
Sports

Ind Vs NZ : वारंवार तीच चूक, रोहित शर्माच्या 'खास' गोलंदाजाचा हार्दिक पंड्या करणार पत्ता कट?

Ind Vs NZ T20 Series : पहिल्या टी २० सामन्यात अर्शदीप सिंग हा टीम इंडियासाठी खलनायक ठरला.

Nandkumar Joshi

Ind Vs NZ T20 Series : रांची येथे झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २१ धावांनी पराभव करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण हे अखेरचे षटक ठरले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकात २७ धावा कुटल्या. याच धावा भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्या.

अर्शदीप सिंगने हे षटक टाकले होते. नो बॉल फेकण्याची चूक त्याने पुन्हा केली आणि त्याचा भारताला मोठा भुर्दंड सोसावा लागला. अर्शदीपने फेकलेल्या नो बॉलवर डेरिल मिचेलने षटकार खेचला. त्यानंतरच्या फ्री हिटवरही त्यानं उत्तुंग फटका मारून धावा खोऱ्यानं ओढल्या.  (India vs New Zealand 1st T20I)

अर्शदीप सिंग याने अखेरच्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवरच २३ धावा दिल्या. अखेरच्या तीन चेंडूंवर त्याने कमबॅक केले आणि अवघ्या चार धावा दिल्या. पण तोपर्यंत टीम इंडियाला (Team India) मोठा फटका बसला होता. १९ षटकांपर्यंत न्यूझीलंडच्या १४९ धावा होत्या. पण २० व्या षटकात २७ धावा दिल्याने न्यूझीलंडची धावसंख्या १७६ पर्यंत पोहोचली.

अर्शदीपचा नो बॉल भारताला महागात पडला

अशी सुमार गोलंदाजी करण्याची अर्शदीपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही नो बॉल फेकून त्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली आणि सामनेही गमावण्याची वेळ संघावर आली.  (IND vs NZ) 

याच महिन्याच्या सुरुवातीला अर्शदीपने श्रीलंकाविरुद्ध पुण्यात झालेल्या टी २० सामन्यात एक-दोन नव्हे तर पाच नो बॉल फेकले होते. त्यावेळीही हार्दिक पंड्याने अर्शदीपवर नाराजी व्यक्त केली होती. अर्शदीपने या चुका सुधारायला हव्यात असं तो म्हणाला होता.

अर्शदीपने केवळ नो बॉलच फेकला नाही, तर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी २० सामन्यात आपल्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवला. २० व्या षटकात त्याने २७ धावा दिल्या. टी २० सामन्यात अखेरच्या षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. त्याने २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी २० सामन्यात २० व्या षटकात एकाच षटकात २६ धावा दिल्या होत्या. दीपक चाहरनेही गेल्या वर्षी विसाव्या षटकात २४ धावा दिल्या होत्या.

रोहित शर्माचा सर्वात खास गोलंदाज, पण...

डेथ ओव्हरमध्ये अर्शदीप हा उत्तम गोलंदाजी करतो. त्यामुळे तो रोहित शर्माचा खास गोलंदाज आहे. पण अर्शदीपनं या चुका लवकरात लवकर सुधारल्या नाहीत, तर हार्दिक पंड्या टी २० संघातून त्याचा पत्ता कापण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक युवा गोलंदाज टीम इंडियात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT