ind vs nz twitter
क्रीडा

IND vs NZ: पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होणार? बंगळुरुतून समोर आली मोठी अपडेट

Ankush Dhavre

India vs Newzealand Weather Update: आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण बंगळुरूत पावसाचा कहर सुरू आहे. गुडघ्याच्या वर पाणी साचलं आहे. ऑरेंज अलर्ट असल्यामुळे शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारत - न्यूझीलंड सामन्यावरही पावसाचं संकट असणार आहे.

जोरदार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कॉलेज सुरू राहणार आहे. मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पावसामुळे भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात येऊ शकले नव्हते. त्यामुळे सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

पहिल्या दिवशी जोरदार पाऊस

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. पहिला दिवस पावसामुळे धुतला जाऊ शकतो. कारण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल.

पूर्ण दिवस पाऊस पडेल. तर दुपारी २ च्या नंतर पाऊस थांबेल. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ४ वाजता पावसाला सुरुवात होईल. या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमची ड्रेनिंग फॅसिलीटी उत्तम आहे. अवघ्या काही मिनिटांत हे मैदान सुकवता येतं. त्यामुळे पाऊस थांबला तर लगेच सामन्याला सुरुवात करता येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या हरियाणा दौऱ्यावर

Shyam Manav: श्याम मानव यांच्या व्याख्यानात राडा; कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांचा गोंधळ, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: आचारसंहिता लागू झाल्यावर निधी दिला का? आम्ही तपास करू; लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचं मोठं वक्तव्य

Raigad : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

Pune Politics: घराणेशाहीविरोधात भाजप कार्यकर्त्यांच बंड; जगताप कुटुंबीयांच्याविरोधात माजी नगरसेवक एकवटले

SCROLL FOR NEXT