ind vs nz twitter
Sports

IND vs NZ: बंगळुरुत पावसाची बॅटिंग! सामना केव्हा सुरु होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

India vs New zealand 1st Test: बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Ankush Dhavre

India vs New zealand 1st Test, Live Weather Update: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला सुरु व्हायला उशीर होणार आहे. ठरलेल्या वेळेनुसार हा सामना ९:३० वाजता सुरु होणार होता. मात्र अजूनपर्यंत नाणेफेकही झालेलं नाही.

केव्हा सुरु होणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात, सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने तुफान बॅटींग केली आहे. या सामन्यातील पाचही दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाने हाहाकार माजवला आहे. बंगळुरुत जोरदार पाऊस सुरु असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस थांबतात अवघ्या काही मिनिटातच सामन्याला सुरुवात होईल. मात्र दिवसभर पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

खेळाडूंचा कसून सराव

ही मालिका वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र अजूनही भारतीय संघाचं फायनलमधील स्थान पक्क झालेलं नाही. भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंडला ३-० ने पराभूत करावं लागणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत २ कसोटी सामने तरी जिंकावे लागणार आहेत.

या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

न्यूझीलंड- टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), माइकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटी सामन्यासाठी), मार्क चेपमन, डेव्हॉन कॉनवे, मेट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ'रूर्के, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र , मिशेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT