Virat Kohli twitter
क्रीडा

IND vs NZ : काय हा प्रकार! रोहित २, विराट ०, राहुल ०, फक्त ४६ धावांत भारताचे शेर ढेर, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

Namdeo Kumbhar

India vs New Zealand 1st Test : घरच्या मैदानावर भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या आक्रमणापुढे भारताचा संघ फक्त ४६ धावांत गार झालाय. मायदेशात भारताचा ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघावर मायदेशात पराभवाची नामुष्की ओढावण्याची चिन्हे आहेत. बंगळरुमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव फक्त ४६ धावांत संपुष्टात आला. मॅट हेनरी आणि विल्यम ओरुक यांच्या भेदक माऱ्यापुढे एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. भारताचे पाच फलंदाज शून्य धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून सर्वाधिक धावा ऋषभ पंत याने काढल्यात.. पंतने २० धावांची खेळी केली.

मॅट हेनरी याने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला तर विल्यम रुक याने चार विकेट घेतल्या. दोघांच्या भेदक माऱ्यापुढे भारताची बलाढ्य फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताचे पाच फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. यामध्ये रनमशीन विराट कोहली, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. किवीच्या भेदक माऱ्यापुढे खातेही उघडता आले नाही. बंगळुरु कसोटीचा पहिला दिवस पावसाने रद्द झाला होता. आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरु झाला. पण रोहित शर्माच्या संघाला अर्धशतकही ठोकता आले नाही.

रोहित, विराट ते पंत, राहुल फेल... जाडेजा अश्विनची जादूही फिकी

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संपूर्ण संघ फक्त ४६ धावांत तंबूत परतला. भारताकडून सर्वाधिक धावा ऋषभ पंत याने काढले. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. पंत याने सर्वाधिक २० धावांचे योगदान दिले. सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल १३ या दोन फलंदाजांनाच दुहेरी आकडा पार करता आला. मोहम्मद सिराज सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला, त्याने चार धावा केल्या.

पंत आणि यशस्वी यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. किवीच्या माऱ्यापुढे भारताचा एकाही फलंदाजाला टिकता आले नाही. भारतीय फलंदाजांनी भागिदारी करण्यावर भर दिला नाही. ये रे माझ्या मागल्या म्हणत एकापाठोपाठ एक तंबूत गेले. सोशल मीडियावर भारतीय संघाची खिल्ली उडवली जात आहे.

रोहित शर्मा २, कुलदीप यादव २, जसप्रीत बुमराह १ यांनाच खाते उघडता आले. उर्वरित पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा यांना खातेही उघडता आले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक आकाऊंट हॅक

VIDEO : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी

Railway IRCTC Share : रेल्वेची मोठी घोषणा अन् शेअरमध्ये अचानक झाली पडझड; नेमकं काय घडलं?

Bhusawal News : फुटबॉल कोचिंग करून परतताच मृत्यूने गाठले; स्विच बंद करताना विजेचा जोरदार झटका

Amravati News : रवी राणा यांना मोठा धक्का ! जितू दुधानेंनी सोडली राणांची साथ | Video

SCROLL FOR NEXT