भारत आणि नेदरलॅंड यांच्यात सिडनीच्या मैदानात सुपर 12 चा सामना रंंगला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर फलंदाज के एल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने नेदरलॅंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. तिघांनीही आक्रमक खेळी करून अर्धशतकी खेळी साकारली. त्यांच्या चौफेर फटकेबाजीमुळं भारतानं नेदरलॅंडला 180 धावांचं आव्हान दिलं. पंरतु, हे आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलॅंडच्या फलंदाजांची पुरती दमछाक झाली. भारतीय गोलंदाजांपुढं नेदरलॅंडचे फलंदाज ढेर झाले. नेदरलॅंडने वीस षटकात 9 विकेटस् गमावत फक्त 123 धावाच केल्या. त्यामुळे सुपर12 च्या दुसऱ्या सामन्यातही भारताचा विजय झाल्याने चार गुण मिळाल्याने भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
भारतानं दिलेलं 180 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलॅंडच्या फलंदाजांची पुरती दमछाक झालीय. अठराव्या षटकात अर्शदीपने दोन विकेट्स घेतल्या. लोगनला बाद केल्यानंतर फ्रेड क्लासेनला अर्शदीपने पायचित केलं.
भारताने दिलेल्या 180 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेरलॅंडच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली आहे. नेदरलॅंडनं 87 धावांवर सहा विकेट्स गमावल्यानं भारत विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. सोळाव्या षटकात मोहम्मद शमीनं टीम प्रिंगलला 20 धावांवर बाद केलं. त्यानंतर सतराव्या षटकात भूवनेश्वरनेही नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे सतरा षटकानंतर नेदरलॅंडची धावसंख्या 97-7 अशी झाली.
भारताने दिलेल्या 180 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेरलॅंडच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली आहे. नेदरलॅंडनं 87 धावांवर सहा विकेट्स गमावल्यानं भारत विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. सोळाव्या षटकात मोहम्मद शमीनं टीम प्रिंगलला 20 धावांवर बाद केलं.
भारताचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन आश्विननं तेराव्या षटकात नेदरलॅंडचे फलंदाज कोलीन आणि टॉम कपूरला बाद केलं. त्यामुळं नेदरलॅंडची धावसंख्या मंदावली. प्रिंगल आणि कर्णधार स्कॉट एडवर्डची कासव गतीनं फलंदाजी सुरु आहे. त्यामुळं पंधरा षटकापर्यंत नेदरलॅंडला 81 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल अप्रतिम गोलंदाजी करत आहे. दहाव्या षटकात त्यानं नेदरलॅंडचा फलंदाज बास लिडीला 16 धावांवर झेलबाद करून नेदरलॅंडला तिसरा धक्का दिला. पॉवर प्ले मध्ये खराब सुरुवात झालेल्या नेदरलॅंडचे फलंदाज दबावात खेळत आहेत. अक्षरने दोन विकेट्स घेतल्यानं नेदरलॅंडची धावसंख्या मंदावली आहे. दहा षटक पूर्ण झाले असून नेदरलॅंडची धावसंख्या 51-3 अशी होती. त्यानंतर फिरकीपटू रवीचंद्रन आश्विननं अकराव्या षटकात फक्त तीन धावा दिल्यानं नेदरलॅंडची धावसंख्या 56-3 वर गेली. तेराव्या षटकात नेदरलॅंडची धावसंख्या 62 वर असताना रवीचंद्रन आश्विननं फलंदाज कोलीनला 17 धावांवर झेलबाद केलं.
भारताने दिलेल्या 180 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी नेदरलॅंडचे सलामीवीर फंलदाज विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओ-डाऊड मैदानात उतरले. मात्र, भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढं त्यांनी नांगी टाकली. भूवनेश्वर कुमारने विक्रमजीत आणि अक्षर पटेलने मॅक्सचा बोल्ड घेतला. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये नेदरलॅंडची सुरुवात खराब झाली. त्यामुळं सात षटकानंतर नेदरलॅंडची धावसंख्या 36-2 अशी झाली. त्यानंतर झालेल्या आठव्या आणि नवव्या षटकात नेदरलॅंडला 11 धावाच मिळाल्या.
भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारनं पॉवर प्ले मध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी केली. भूवनेश्वरनं पहिल्या षटकात अचूक टप्प्यावर चेंडू फेकल्यानं नेदरलॅंडला खातंही उघडता आलं नाही. तसंच तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा भूवनेश्वरने सटीक गोलंदाजी करून नेदरलॅंडचा सलामीवीर फलंदाज विक्रमजीत सिंग दांडी गुल केली. त्यामुळं तीन षटकानंतर नेदरलॅंडची धावसंख्या 11-1 अशी झाली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या षटकात नेदरलॅंडला धावांचा सूर गवसला नाही. पाचव्या षटकात फिरकीपटू अक्षरने मॅक्स ओ-डाऊडला बोल्ड केलं. मॅक्सने 16 धावा केल्या तर विक्रमजीत अवघ्या एका धावेवर बाद झाला.
भारताने नेदरलॅंडला जिंकण्यासाठी 180 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी नेदरलॅंडचे सलामीवीर विक्रमजीत-मॅक्स मैदानात उतरले आहेत. मात्र, पहिल्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यानं नेदरलॅंडला खातंही उघडता आलं नाही.
भारत आणि नेदरलॅंड यांच्यात सिडनीच्या मैदानावर टी 20 सामना खेळवला जात आहे. या मैदानात आजच्या सामन्यातही पावसाची रिमझीम होती. त्यामुळं नाणेफेक उशिराने झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल. त्यानंतर मैदानता उतरलेला भारताचा सलामीवीर फंलदाज के एल राहुल सुपर 12 च्या दुसऱ्या सामन्यातही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आक्रमक खेळी केली. रोहित-विराटनं नेदरलॅंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत अर्धशतक ठोकलं.
कमालीचा फॉर्मात असलेला भारताचा 360 डिग्री प्लेयर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चमकला. विराटसोबत सूर्यकुमारनं मैदानात धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मानं 39 चेंडूत 53 धावा, विराट कोहलीनं 44 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून शेवटच्या चेंडूत षटकार ठोकून अर्धशतक केलं. सूर्यकुमारने 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी साकारली. त्यामुळं वीस षटकात भारतानं 179-2 धावा केल्या. नेदरलॅंडला भारताने 180 धावांचं आव्हान दिलं आहे.
भारताचा सलामीवीर फंलदाज के एल राहुल सुपर 12 च्या दुसऱ्या सामन्यातही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आक्रमक खेळी केली. रोहित-विराटनं नेदरलॅंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत अर्धशतक ठोकलं.
सतराव्या षटाकात विराट कोहलीनं आक्रमक खेळी करून टी-20 वर्ल्डकप 2022 मधील सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. सूर्यकुमार आणि विराटने शेवटच्या षटकांमध्य चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे.
भारताचे आक्रमक फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव मैदानात असून नेदरलॅंडच्या गोलंदाजांवर प्रहार करत आहेत. सूर्यकुमारने नेहमीप्रमाणे त्याच्या आक्रमक अंदाजात खेळायला सुरुवात केलीय. चौदाव्या षटकात दोन चौकार ठोकून सूर्यकुमारने भारताला शंभरी पार केलं. त्यामुळे भारताची धावसंख्या 106-2 वर पोहोचली. पंधराव्या षटकात भारताला आठ धावा मिळाल्या. दरम्यान, सोळाव्या षटकात सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करून दोन चौकार ठोकले. विराटनेही एक चौकार मारल्याने भारत 128-2 वर पोहोचला.
पॉवर प्ले संपल्यानंतर भारताने धावसंख्येचा आलेख उंचावण्यास सुरुवात केलीय. कर्णधार रोहित शर्मा आक्रमक खेळी करत असून दुसरीकडे विराट कोहलीही सावधपणे फंलदाजी करत आहे. त्यामुळे दहा षटकानंतर भारताची धावसंख्या 67-1 झाली. त्यानंतर अकराव्या षटकात रोहित शर्मानं अर्धशतकी खेळी साकारली. भारत 11 षटकानंतर 78-1 वर पोहोचला. मात्र, बाराव्या षटकात भारताच कर्णधार रोहित शर्मा फ्रेड क्लासेनच्या गोलंदाजीवर 53 धावांवर बाद झाला. रोहितने 39 चेंडूत 53 धावा कुटल्या. दरम्यान, तेरा षटकानंतर भारताची धावसंख्या 95-2 अशी आहे. विराट आणि सूर्यकुमार यादव फलंदाजी करत आहे.
भारताचे सलामवीर फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात उतरल्यानंतर तिसऱ्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. मात्र, पॉल मिकिरेनच्या गोलंदाजीवर के एल राहुल नऊ धावांवर पायचित झाला. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली सावधपणे फलंदाजी करत असून भारताची धावसंख्या धिम्या गतीनं वाढत आहे. सात षटकानंतर भारत 38-1 वर होती. त्यानंतर आठव्या षटकात रोहितने आक्रमक खेळी करून षटकार ठोकला. त्यामुळे भारत 48-1 वर पोहोचला. त्यानंतर शारीज अहमदच्या गोलंदाजीवर भारताला पाच धावाच मिळाल्या. नऊ षटकानंतर भारत बिनबाद 53 धावांवर पोहोचला.
पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद सातवर होती. दरम्यान, नेदरलॅंडचा फिरकीपटू टीम प्रिंगलने दुसर षटकं टाकलं. भारताला या षटकात अवघ्या दोनच धावा मिळाल्या. त्यामुळे दोन षटकानंतर भारत 9-0 वर पोहोचला. मात्र, पॉल मिकिरेनच्या गोलंदाजीवर के एल राहुल नऊ धावांवर पायचित झाला. त्यामुळे तीन षटकानंतर भारताची धावसंख्या 18-1 अशी होती. त्यानंतर नेदरलॅंडचा गोलंदाज बास लिडिनं चौथ्या षटकात पाच धावा दिल्या. त्यामुळे चार षटकानंतर भारताची धावसंख्या 23-1 अशी होती. त्यानंतर फ्रेड क्लासेननं पाचवं षटक टाकल्यानंतर भारताची धावसंख्या 28-1 झाली .
आजही पावासाने व्यत्यय आणल्याने भारत आणि नेदरलॅंडची नाणेफेक उशिराने झाली. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलॅंडचा वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेननं पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद सातवर होती. दरम्यान, नेदरलॅंडचा फिरकीपटू टीम प्रिंगलने दुसर षटकं टाकलं. भारताला या षटकात अवघ्या दोनच धावा मिळाल्या. त्यामुळे दोन षटकानंतर भारत 9-0 वर पोहोचला. मात्र, पॉल मिकिरेनच्या गोलंदाजीवर के एल राहुल नऊ धावांवर पायचित झाला. त्यामुळे तीन षटकानंतर भारताची धावसंख्या 18-1 अशी होती.
भारत आणि नेदरलॅंडमध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुपर 12 मधील भारताच दुसरा सामना रंगणार आहे. टी 20 वर्ल्डकपचा थरार पाहण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने चार विकेट्सने मेलबर्नच्या मैदानात जिंकला होता. दरम्यान, आज नेदरलॅंड विरुद्ध दुसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. परंतु, याच मैदानावर आर्यलॅंड आणि इंग्लंडमध्ये सामना झाला होता. सामन्यादरम्यान पावसाने खोडा घातल्याने हा सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार आर्यलॅंडने पाच धावांनी जिंकला. आजही पावासाने व्यत्यय आणल्याने भारत आणि नेदरलॅंडची नाणेफेक उशिराने झाली. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.