rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma: धोनी,विराट अन् गांगुलीसारख्या दिग्गजांना जे नाही जमलं ते रोहितने करुन दाखवलं; पाहा Video

Rohit Sharma Record: रोहित शर्माने या सामन्यात मोठा रेकॉर्ड केला आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023, Rohit Sharma Record:

भारतीय संघाने क्रिकेट फॅन्सची दिवाळी आणखी गोड केली आहे.वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात भारतीय संघाने १६० धावांनी विजय मिळवला.

हा भारताचा सलग नववा विजय ठरला आहे. या विजयात सर्व ११ खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं. दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसून आले आहेत.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संपूर्ण संघ अवघ्या २५० धावांवर गारद झाला.

फलंदाजीत अर्धशतक झळकावणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दिसून आले. विराटने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद करत माघारी धाडलं तर रोहितने निदामनुरुला बाद केलं.

रोहितने निदामनुरुला बाद करताच मोठा रेकॉर्ड झाला आहे. रोहित १९८३ वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकाच सामन्यात ५० धावा १ गडी बाद करणारा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८३ वर्ल्डकप स्पर्धेत झिम्ब्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात १७५ धावांची खेळी केली होती. यासह गोलंदाजीत त्यांनी १ गडी देखील बाद केला होता. (Latest sports updates)

भारताचा जोरदार विजय..

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सुरुवातीच्या पाचही फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली.

रोहितने ६१, शुभमन गिलने ५१, विराट कोहलीने ५१ ,श्रेयस अय्यरने १२८ आणि केएल राहुलने १०२ खेळी केली. या डावात भारतीय संघाने ४१० धावांचा डोंगर उभारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पोस्टल मतदानात मविआ आणि महायुतीत काँटे की टक्कर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT