india vs netherland  twitter
Sports

IND vs NED: दिवाळी धमाका करण्यासाठी टीम इंडिया मैदानात! टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

India vs Netherland Toss And Playing 11 Update: या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

India vs Netherland Toss And Playing 11 Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. भारतीय संघाने ८ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हे ८ सामने जिंकून १६ गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. नेदरलँडविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अजिंक्य राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर नेदरलँड संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, नेदरलँडने ८ सामने खेळले आहेत. या ८ पैकी केवळ २ सामन्यात नेदरलँडला विजय मिळवता आला आहे. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँडचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

या सामन्यासाठी अशी आहे नेदरलँडची प्लेइंग ११ं:

वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

Jio-Airtel Recharge Plans: वाह क्या बात! डेटा रिचार्जचे सहा भन्नाट प्लॅन्स; फक्त ५ रुपयांत मिळेल इंटरनेट डेटा

मनोज जरांगे पाटील चौथी पास झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा रॅपमधून हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT