jasprit bumrah  saam tv
क्रीडा

IND VS NEP,Playing XI: बुमराहची जागा कोण घेणार? पाहा नेपाळविरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11

India vs Nepal News In Marathi: पाहा या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India vs Nepal, Asia Cup Playing 11 Prediction:

भारतीय संघाचा आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध रंगला होता. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना नेपाळविरूद्ध रंगणार आहे.

या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोण खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असेल या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११.

टॉप ऑर्डर..

नेपाळ विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी क्रमात कुठलाही बदल पाहायला मिळणार नाही. गेल्या सामन्या प्रमाणेच या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी येऊ शकतो. तर अनुभवी फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येईल.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. हा त्याचा कमबॅक सामना होता. या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर पाचव्या क्रमांकावर ईशान किशन, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा खेळताना दिसून येईल.

गोलंदाजी क्रमात होणार बदल...

नेपाळ विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळू शकतो. कारण संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह काही वैयक्तिक कारणास्तव मुंबईत परतला आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. तर शार्दुल ठाकूरचा देखील या संघात समावेश केला जाऊ शकतो.

मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. तर कुलदीप यादवला फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. (Latest sports updates)

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT