IND vs IRE 1st T20I Saam tv
Sports

IND vs IRE 1st T20I: भारताचे गोलंदाज पुन्हा ठरले सरस; आयर्लंडचं टीम इंडियासमोर विजयासाठी १४० धावांचं लक्ष्य

IND vs IRE 1st T20I : आयर्लंडने भारताला जिंकण्यासाठी १४० धावांचे आव्हान दिले आहे.

Vishal Gangurde

IND vs IRE 1st T20I News: भारत विरुद्ध आयर्लंडचा तीन सामन्यांची मालिका डबलिनमध्ये सुरू आहे. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पॉवरप्लेमध्ये आयर्लंडचा निम्मा संघ गारद झाला. या आयर्लंडने भारताला जिंकण्यासाठी १४० धावांचे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयर्लंडचा निम्मा संघ अवघ्या ३१ धावांवर बाद झाला. ११ महिन्यांनतर टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहने पहिल्या षटकात आयर्लंडचे दोन गडी बाद केले.

बुमराहने अँड्रयू बालबर्नी आणि लार्केन टकरला बाद केले. त्यानंतर रवी बिष्णोईने पॉल स्टर्लिंगला बाद केले. तर कृष्णाने हॅरी आणि डॉकरेलला बाद केले.

रवि बिष्णोईच्या फिरकीने पुन्हा एकदा चमत्कार करत आयर्लंडचा सहावा गडी गारद केला. एडायर १६ धावांवर बाद झाला. पुढे कर्टिस कँपर आणि बॅरी मॅक्कार्थीने संघाची कमान सांभाळत धावसंख्या १०० पार केली. या दोघांनी अर्धशतकी भागिदारीही रचली.

जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले. त्याने चार षटकात २४ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने १ गडी बाद केला. कृष्णाने २ गडी बाद केले. तर रवि बिष्णोईनेही २ गडी बाद केले. आयर्लंड संघाने या सामन्यात भारताला १४० धावांचे आव्हान दिले.

तत्पूर्वी, ११ महिन्यानंतर संघात पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या मालिकेत आयपीएलमधील स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह, जितेश शर्मा देखील खेळताना दिसू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT