india vs ireland 1st t20i saam tv
Sports

IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

India vs Ireland 1st T20I Playing 11: पहिल्या टी-२० सामन्यासाठी अशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India Tour Of Ireland:

भारताचा वेस्टइंडीज दौरा नुकताच संपन्न झाला आहे. आता भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. आयर्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

सलामी जोडी...

या सामन्यात उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊ शकतात. हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत त्यामुळे दोघं मिळून संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात.

मध्यक्रम..

आयर्लंडविरुध्द होणाऱ्या पहिल्या टी -२० सामन्यात तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. नुकताच संपन्न झालेल्या वेस्टइंडीज विरुध्दच्या टी -२० मालिकेत धावांचा पाऊस पाडला होता.

तर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. संधीच्या शोधात असलेल्या रिंकू सिंगला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तो पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येऊ शकतो. (Latest sports updates)

अष्टपैलू खेळाडू..

आयर्लंड विरुध्दच्या पहिल्या टी -२० सामन्यात शिवम दुबेला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. तर ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या शाहबाज अहमदला सातव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

फिरकी गोलंदाज..

फिरकी गोलंदाज म्हणून युवा गोलंदाज रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते.

वेगवान गोलंदाज..

आयर्लंड विरुध्दच्या पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून कर्णधार जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार मैदानात उतरू शकतात.

अशी असू शकते प्लेइंग ११

ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह (कर्णधार), अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT