IND vs ENG Head To Head Record twitter
Sports

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध रोहित सेना लगावणार विजयाचा षटकार? इंग्लंडच्या या रेकॉर्डने वाढवलय टेन्शन

IND vs ENG Head To Head Record: वाचा कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड

Ankush Dhavre

IND vs ENG Head To Head Record:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडला आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये केवळ एक सामन्यात विजय मिळवला आहे.

भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये असला तरीदेखील भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे गेल्या २० वर्षांत भारतीय संघ इंग्लंडला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाने २००३ वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडला धुळ चारली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघ इंग्लंडला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. वर्ल्डकप २०१९ स्पर्धेतही भारतीय संघाने सर्व सामने जिंकले होते. मात्र इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २०११ मध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला होता.

२० वर्षांपूर्वी मिळवला होता विजय..

वनडे वर्ल्डकप २००३ स्पर्धेत भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या १६८ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आशिष नेहराने सर्वाधिक ६ गडी बाद केले होते. तर जहिर खानने २ गडी बाद केले होते. (Latest sports updates)

तर दोन्ही संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील एकुण रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली होती. हे दोन्ही संघ १९७५ मध्ये आमने सामने आले होते. त्यानंतर १९८३ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला होता. पुढील दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये इंग्लंडने बाजी मारली होती. १९९९ आणि २००३ वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कमबॅक करत भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT