Indian cricket team saam tv
Sports

IND vs ENG : सूर्यकुमार यादव करणार श्रेयस अय्यरला बाहेर, कोहलीवर सस्पेंस, 'अशी' आहे संभाव्य प्लेईंग - ११

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून लंडनमध्ये सुरु होत आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून लंडनमध्ये सुरु होत आहे. इंग्लंड विरुद्ध भारताचा (India vs England) पहिला एकदिवसीय सामना केनिंगटन ओव्हलवर खेळवण्यात येणार आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन पाच महिन्यानंतर टीम इंडियात (Indian Cricket Team) पुनरागमन करत आहे. कर्णधार (Rohit Sharma) रोहित शर्मासोबत शिखर धवन सलामीला उतरणार आहे. तर विराट कोहली (virat Kohli) दुखापतग्रस्त असल्याने आजच्या सामन्यात तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

रोहित शर्माकडे कोणते पर्याय ?

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मातून जात आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतली विराट धावांसाठी संघर्ष करताना दिसला. विराटच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत, कारण इंग्लंड विरोधात झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला आहे. अशातच आता आज होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटला विश्रांती दिल्यावर रोहित शर्माकडे अन्य खेळाडूंचे पर्याय आहेत. विराटच्या जागी प्लेईंग ईलेव्हन मध्ये इशान किशनला संधी मिळू शकते. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवने शतक ठोकलं होतं, त्यामुळे यादवला बाहेर ठेवणं चुकीचा निर्णय ठरु शकतो. त्यामुळे श्रेयस अय्यरला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग- 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार),शिखर धवन, विराट कोहली/ईशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि युजवेंद्र चहल.

इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट,बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, डेविड विली, रीस टॉपले आणि मॅट पार्किसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT