Cricket Players twitter
Sports

IND vs ENG 5th Test: धरमशाला कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत! रोहित- गिलच्या शतकी खेळीच्या बळावर घेतली मोठी आघाडी

India vs England 5th Test: मोहालीच्या थंड वातावरणातही भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे. मालिकेतील पाचवा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs England 5th Test, Day 2 Highlights:

मोहालीच्या थंड वातावरणातही भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे. मालिकेतील पाचवा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव २१८ धावांवर संपुष्टात आणला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने २५५ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने घेतली २५५ धावांची आघाडी..

इंग्लंडने केलेल्या २१८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र यशस्वी जयस्वाल ५७ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर रोहितने मोर्चा सांभाळला. रोहितने यशस्वी जयस्वालसोबत मिळून १७१ धावांची भागीदारी केली. रोहितने १०३ धावांची खेळी केली. तर शुभमन गिल ११० धावांची खेळी करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

रोहित आणि गिलची जोडी बाद झाल्यानंतर सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कलने संघाचा गाडा पुढे नेला. आपला पहिलाच सामन खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने ६५ धावांची झुंजार खेळी केली. तर सरफराज खान ५६ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ८ गडी बाद ४७३ धावा केल्या आहेत. कुलदीप यादव २७ धावांवर तर जसप्रीत बुमराह १९ धावांवर नाबाद आहे. यासह भारतीय संघाने २५५ धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंडने केल्या २१८ धावा..

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१८ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने २९, जो रुटने २६ आणि बेन फोक्सने २४ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५, आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT