abhishek sharma twitter
Sports

IND vs ENG, 5th T20I: वानखेडेवर पैसा वसूल मॅच; अभिषेकचं वादळी शतक अन् भारताने उभारला रेकॉर्डब्रेकिंग स्कोअर

India vs England 5th T20I 1st Inning: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २४७ धावांचा डोंगर उभारला आहे. तर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २४८ धावा करायच्या आहेत.

इंग्लंडने जिंकला टॉस

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला आणि वानखेडे मैदानावर फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण स्विकारुन भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर तुटून पडले.

सामन्यातील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने षटकार खेचून दमदार सुरुवात करुन दिली. संजू सॅमसन १६ धावा करत तंबूत परतला. पण त्यानंतर संजू बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने २४ धावांची खेळी करत अभिषेक शर्माला चांगली साथ दिली.

मात्र तिलकनंतर फलंदाजीला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप ठरला. तो अवघ्या २ धावांवर माघारी परतला. शेवटी शिवम दुबेने १३ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली.

अभिषेक शर्माचं वादळी शतक

आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. यादरम्यान ३७ चेडूंचा सामना करत त्याने आपलं वादळी शतक पूर्ण केलं. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसरं शतक ठरलं आहे. यासह दुसरं सर्वात वेगवान शतकही ठरलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड (Playing XI):

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅथेल, ब्रायडन कर्स, जेमी ओव्हर्टन, जोफ्रा आर्चर, अदिल रशीद, मार्क वुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT