abhishek sharma twitter
Sports

Abhishek Sharma: वानखेडेवर शर्मा चमकला! तुफान फटकेबाजीसह झळकावलं दुसरं शतक; रोहितचा विक्रम थोडक्यात हुकला

Abhishek Sharma Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने वादळी शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. मुंबईत झालेल्या सामन्यातही शर्मा मॅजिक पाहायला मिळाला आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या होमग्राऊंडवर अभिषेक शर्माचा बोलबाला पाहायला मिळाला.

या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत शानदार शतकी खेळी केली आहे.

अभिषेक शर्माची वादळी खेळी

वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माची शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माने सुरुवातीच्या षटकापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

अभिषेकने या डावात ३७ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीदरम्यान त्याने ५ चौकार १० षटकार खेचले. अभिषेकने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. यासह आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे.

असा रेकॉर्ड करणारा दुसराच फलंदाज

अभिषेक शर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. या डावात फलंदाजी करताना त्याने एकूण १५ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवले. अवघ्या ३७ चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.

या यादीत भारताचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितने २०१७ मध्ये अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. यापूर्वी डेव्हिड मिलरने देखील अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

Shravan Shanivar: श्रावणात शनिवारी अवश्य करा हे 3 उपाय, शनिदेव होतील प्रसन्न

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी| VIDEO

दलित तरुणाला विवस्त्र करत बेदम मारहाण, खामगावात संतापजनक प्रकार

Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

SCROLL FOR NEXT