virat kohli twitter
Sports

IND vs ENG: किंग कोहलीचं 'विराट' कमबॅक! मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गजांना मागे सोडत बनला नंबर १

Virat Kohli Record, IND vs ENG 3rd ODI: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करुन दाखवला आहे.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या काही दिवसांवर आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे संघातील चॅम्पियन फलंदाज फॉर्ममध्ये परतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जे फलंदाज फॉर्मच्या शोधात होते, ते दोन्ही फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत परतले आहेत.

कटकच्या मैदानावर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली होती. तर अहमदाबादच्या मैदानावर विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला .

विराटची अर्धशतकी खेळी

विराट कोहली फॉर्ममध्ये केव्हा परतणार ? असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून उपस्थित केला जात होता. अहमदाबादच्या मैदानावर त्याला सूर गवसला. गिलसोबत मिळून त्याने शानदार भागीदारी केली. ५१ चेंडूंचा सामना करत त्याने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर ५५ धावांवर तो आदिल रशिदच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला.

विराटने रचला इतिहास

विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार सुरुवात मिळाली होती. शानदार सुरुवात मिळाल्यानंतर त्याला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराट आता इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने इंग्लंडविरुद्ध खेळताना ४००० धावांचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान त्याने सचिनसह, एमएस धोनी आणि राहुल द्रविडला देखील मागे सोडलं आहे.

असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील सहावा फलंदाज

विराट कोहली इंग्लंडविरुद्ध खेळताना ४००० धावांचा पल्ला गाठणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. विराटने हा कारनामा ८७ व्या डावात करुन दाखवला आहे. यादरम्यान त्याने २३ अर्धशतकं झळकावली आहेत. या यादीत इंग्लंडचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहे. ब्रॅडमन यांच्या नावे ३७ कसोटीत ५०२८ धावा करण्याची नोंद आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

डॉन ब्रॅडमन - ५०२८ धावा

अॅलेन बॉर्डर - ४८५० धावा

स्टीव्ह स्मिथ- ४८१५ धावा

विवियन रिचर्ड्स - ४४८८ धावा

रिकी पाँटींग- ४१४१ धावा

विराट कोहली - ४००१ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT