IND vs ENG Saam Tv
Sports

IND vs ENG: पंत-हार्दिकच्या धमाक्याने टीम इंडियाचा शानदार विजय; ODI मालिका २-१ ने जिंकली

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने अशी जिंकली आहे.

साम वृत्तसंथा

IND vs ENG: टीम इंडियाने रविवारी १७ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध (England) झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला. मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे भारतीय संघाने पाच गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने वनडे मालिका २-१ ने खिशात घातली.

भारतीय संघाच्या (Team India) विजयात ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली. पंतने १२५ धावांची शानदार खेळी केली. पंड्याने अष्टपैलू कामगिरी केली. ऋषभ पंतला सामनावीर आणि हार्दिक पंड्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

दुसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय संघातील आघाडीची फळी फ्लॉप ठरली. शिखर धवन पहिल्यांदा १ धावावर बाद झाला. धवनचा झेल रीस टोपलीकरवी जेसन रॉयने घेतला. यानंतर कर्णधार रोहित शर्माही बाद झाला. चार चौकारांच्या मदतीने रोहितने १७ धावा केल्या. रोहितला (Rohit Sharma) रीस टोपलीने पॅव्हेलियनमध्ये पाठवला.

दोन विकेटनंतर विराट कोहली मैदानात होता, पण कोहलीही झेलबाद झाला. कोहलीने २२ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावा केल्या. कोहली (Virat Kohli) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यामुळे भारताची धावसंख्या ४ बाद ७२ अशी झाली होती.

७२ धावांवर चार विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी १३३ धावांची भागीदारी करून भारताला सामन्यात टीमची कमान सांभाळली. हार्दिकने ५५ चेंडूत १० चौकारांसह झटपट ७१ धावा केल्या. ऋषभ पंतने ११३ चेंडूत १२५ धावा करून नाबाद राहिला. पंतने आपल्या खेळीत १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. पंतचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (Cricket) पहिले शतक होते. भारताने ४७ चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला.

नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा पूर्ण संघ ४५.५ षटकांत २५९ धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ६० धावा केल्या. सलामीवीर जेसन रॉयने ४१आणि मोईन अलीने ३४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

SCROLL FOR NEXT