England announce playing XI for first ODI against India : टी २० मालिकेत भारतीय संघाला चारीमुंड्या चीत केल्यानंतर इंग्लंडनं वनडे मालिका सुरू होण्याआधीच मोठा डाव टाकला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या, १४ जुलैला बर्मिंघमच्या ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याच्या आधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
इंग्लंडने भारतीय संघाविरुद्ध सर्वात घातक प्लेइंग ११ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हॅरी ब्रुकच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पहिल्या वनडे सामन्यासाठी काही चकित करणारे बदल केले आहेत. त्यात सलामीला मैदानात उतरणारे फलंदाजही बदलले आहेत.
इंग्लंडने भारताच्या वर्ल्डक्लास गोलंदाजी माऱ्याचा सामना करण्यासाठी टॉप ऑर्डरमध्ये मोठी बदल केला आहे. खरे तर हा निर्णय आश्चर्यकारक आहे. युवा अष्टपैलू जेकब बेथेल याला बढती दिली असून, सलामीला मैदानात उतरण्याची संधी दिली आहे. स्फोटक फलंदाज बेन डकेट याच्यासोबत तो डावाची सुरुवात करणार आहे.
जेकब बेथेल यानं टी २० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याचं योग्य फळ त्याला मिळालं आहे. आता तो वनडे मालिकेत सलामीला खेळणार आहे. तर अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रूट नेहमीप्रमाणे क्रमांक तीनवर फलंदाजीसाठी उतरेल. त्याच्यावर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
इंग्लंडचा सर्वात आक्रमक फलंदाज जोस बटलर हा मधल्या फळीत खेळणार आहे. बटलरकडे या सामन्यात विकेटकीपिंगची जबाबदारी असेल. जोस बटलरसाठी हा सामना महत्वाचा आहे. भारतीय संघाविरुद्ध बटलर मैदानात उतरताच एक अनोखा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. इंग्लंडकडून तो २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. २१ फेब्रुवारी २०१२ रोजी दुबईत पाकिस्तानच्या विरोधात त्याने वनडे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. १४ वर्षांनंतर तो या विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे.
एजबेस्टनची खेळपट्टी आणि रोहित आणि विराटसह भारताची आक्रमक फलंदाजी लक्षात घेऊन इंग्लंडने गोलंदाजी मारा भक्कम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसारच त्यांनी संघाची निवड केली आहे. तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा प्रमुख गोलंदाज असेल. तर सॅम करन आणि जोश टंग हा गोलंदाजीची धुरा सांभाळेल. दुसरीकडे भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात ओढण्यासाठी इंग्लंडने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. अनुभवी फिरकीपटू आदिल राशिद, विल जॅक्स आणि लियाम डॉसन हे फिरकीची जादू दाखवतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.