India vs Bangladesh Toss Update And Playing 11 twitter
Sports

IND vs BAN: पुण्यात २७ वर्षांनंतर वर्ल्डकपचा थरार! बांगलादेशचा नाणेफेक जिंकत बॅटींगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

India vs Bangladesh Toss Update And Playing 11: हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे .

Ankush Dhavre

India vs Bangladesh Toss Update And Playing 11:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे

या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. मात्र असं काहिच झालेलं नाही.

बांगलादेश संघात मोठा बदल..

या सामन्यात शाकिब अल हसन खेळताना दिसून येणार नाही. त्याच्याऐवजी नजमुल हुसेन शांतो बांगलादेश संघाचे नेतृत्व करणार आहे. शाकिब अल हसन दुखापतग्रस्त असल्याची माहिती नजमुल हुसेन शांतोने दिली आहे. त्याच्यऐवजी नसुम अहमदला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर तस्किन अहमदच्या जागी महमुदला संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यासाठी अशी आहे बांगलादेश संघाची प्लेइंग ११ लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला फक्त ५ मिनिटांत नेसा नऊवारी साडी; 'ही' घ्या सोपी ट्रिक, सर्वात सुंदर दिसेल तुमचा मराठमोळा लूक

Backless Blouse Designs: लग्नात सुंदर दिसण्यासाठी ओपन बॅक स्टाईल ब्लाऊज, नवरीचा लूक दिसले भारी

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

Summer Beauty Tips : उन्हाळ्यातही राहाल फ्रेश अन् सुगंधीत; महिलांनो 'हे' ब्युटी सीक्रेट तुम्हाला कायम घाम, दुर्गंधीपासून ठेवेल दूर

Shocking : संतापजनक! ८९ वर्षाच्या महिलेला रूग्णालयात उंदराने कुरतडले, ICU मधील भयावह घटना

SCROLL FOR NEXT