ind vs ban 
Sports

केव्हा, कुठे अन् कधी होणार IND vs BAN मालिकेतील सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN Schedule: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. पाहा कसोटी मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

Ankush Dhavre

भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर आहेत. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० मालिकेचा थरार रंगला होता.

त्यानंतर भारतीय संघाला ४३ दिवसांचा ब्रेक मिळाला. आता भारतीय संघ बांगलादेशला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान ही मालिका केव्हा, कुठे आणि कधी रंगणार? जाणून घ्या.

बांगलादेशचा संघ नुकताच पाकिस्तान दौऱ्यावरुन परतला आहे. या दौऱ्यावर बांगलादेशने शानदार खेळ केला आणि दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. यासह बांगलादेशने इतिहास रचला. यापूर्वी बांगलादेशने परदेशात जाऊन खेळताना एकही मालिका जिंकली नव्हती. त्यामुळे बांगलादेशसाठी ही मालिका ऐतिहासिक ठरली. आता बांगलादेशचा संघ भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार भारत- बांगलादेश मालिका?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडीयमवर रंगणार आहे. हा सामना १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. हा सामना सकाळी ९:३० वाजता सुरु होईल. हा सामना तुम्ही नेटवर्क १८ वर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता.

भारत-बांगलादेश मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना - चेन्नई (१९ ते २३ सप्टेंबर)

भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना - कानपुर (२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर)

टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टी-२० सामना - धर्मशाळा (६ ऑक्टोबर)

भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी-२० सामना - दिल्ली (९ ऑक्टोबर)

भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी-२० सामना - हैदराबाद (१२ ऑक्टोबर)

कसोटी मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT