team india yandex
Sports

Team India News: बांगलादेशची खैर नाय! शमी,बुमराहपेक्षाही खतरनाक गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

Umran Malik Comback: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान या मालिकेत भारताचा स्टार गोलंदाज कमबॅक करु शकतो.

Ankush Dhavre

Ind vs Ban: भारतीय संघातील खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यावरुन परतल्यानंतर भारतीय खेळाडूंना ४३ दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर मोहम्मद शमीचंही कमबॅक होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे भारतीय संघाला अशा एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे. जो आपल्या भन्नाट गतीच्या बळावर विरोधी संघातील गोलंदाजांना गारद करेल.

टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कमबॅक करणार?

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ४ संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांमध्ये स्टार खेळाडूंना स्थान दिलं गेलं आहे. यासह भारतीय संघातील प्रमुख खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत.

ही स्पर्धा, भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येतील. त्यापैकीच एक म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाद उमरान मलिक.

जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकला सुरुवातीला भारतीय संघात स्थान देण्यासाठी जोरदार मागणी केली जात होती. मात्र त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर पडावं लागलं होतं. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी उमरान मलिकचा सी संघात समावेश करण्यात आला आहे. तो ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.

दरम्यान या स्पर्धेपूर्वी बोलताना तो म्हणाला की,' मी पूर्णपणे ठिक आहे. मी एनसीएमध्ये आगामी दुलीप ट्रॉफीसाठीचा सराव करतोय. मला आशा आहे की, मी माझ्या संघासाठी या हंगामात चांगली कामगिरी करेल.'असं उमरान मलिक म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT