India vs Bangladesh ODI Series : भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशात पोहोचला आहे. या मालिकेची सुरुवात रविवारपासून होत आहे. मात्र, या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारतीय संघातील महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा या मालिकेतून बाहेर झाला आहे. हाताला दुखापत झाल्यानं तो या मालिकेतून बाहेर गेला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली.
मोहम्मद शमी अलीकडेच ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी २० विश्वकपमध्ये खेळला होता. त्यानंतरच्या मालिकेत त्यानं विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी झाला नव्हता. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत तो खेळणार होता. पण आता दुखापतीमुळं तो संघाबाहेर झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीकडे गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, आता तोच बाहेर गेल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. (Latest Marathi News)
कसोटीमधूनही बाहेर होण्याची शक्यता
पीटीआयच्या वृत्तानुसार, शमीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. त्यामुळं तो वनडे संघातून बाहेर झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दुखापतीमुळं या कसोटी मालिकेतूनही बाहेर होण्याची शक्यता आहे. शमीला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. शमी हा पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी महत्वाचा खेळाडू आहे. (Sports News)
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
शमी कसोटी मालिकेतून बाहेर होणे ही रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे. सूत्रांनुसार, शमीचं तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतून संघाबाहेर राहणे चिंतेची बाब आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे तो कसोटी संघातूनही बाहेर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.