विश्वचषकातील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने दिलेलं २५७ धावांचं आव्हान टीम इंडियानं सहज पार केलं. टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. (Latest Marathi News)
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत भारताला २५७ धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करताना रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहलीने दमदार खेळी खेळली. बांगलादेशने दिलेले आव्हान भारताने ४१.३ षटकात तीन गडी गमावून पूर्ण केलं. या डावात विराट कोहलीने शानदार शतक ठोकलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.या शतकात ६ चौकार आएणि ४ षटकारांचा सामावेश आहे. तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावा कुटल्या. कोहली आणि राहुलने चौथ्या गडीसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी रचली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा चोपल्या. बांगलादेशच्या तंजीद हसन आणि लिटन दासने पहिल्या विकेटसाठी ९३ धावा कुटल्या. तंजीद खान ५१ धावांवर पायचीत झाला. तर लिटने ८२ चेंडूत ६६ धावा कुटल्या. महमूदुल्लाहने ४६ धावांचं योगदान दिलं.
बांगलादेशच्या लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या. तर भारतासाठी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. या विजयामुळे टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.