India vs Bangladesh Toss Update And Playing 11 Saam tv
क्रीडा

IND vs BAN, Asia Cup 2023: बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात रोहितने जिंकला टॉस; टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये ५ मोठे बदल

India vs Bangladesh Toss Update And Playing 11: या सामन्यासाठी भारतीय संघात ५ मोठे बदल करण्यात आले आहेत.

Ankush Dhavre

India vs Bangladesh Toss Update And Playing 11:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना भारत विरूद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आले आहे.

भारतीय संघात ५ मोठे बदल..

या सामन्यासाठी भारतीय संघात ५ मोठे बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना येत्या १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरूद्ध रंगणार आहे.

त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी संघातील ५ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ज्यात विराट कोहली, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

तर तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

या सामन्यासाठी अशी आहे बांगलादेश संघाची प्लेइंग ११:

लिटन दास (यष्टीरक्षक), तनझिद हसन, अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT