TEAM INDIA TWITTER
Sports

IND vs BAN: दसऱ्याला टीम इंडियानं लुटलं धावांचं सोनं; बांगलादेशच्या गोलंदाजांना धुतलं, षटकार-चौकारांचा पाऊस

India vs Bangladesh 3rd T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये तिसरा टी-२० सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 3rd T2OI Live: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची इतकी धुलाई केलीय, की बांगलादेशचे गोलंदाज कधीच विसरु शकणार नाहीत.

आधी संजू सॅमसन मग सूर्यकुमार यादव त्यानंतर रियान पराग आणि शेवटी हार्दिक पंड्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडत, बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. यासह भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाने बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी २९८धावांचं आव्हान ठेवलं आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय संघाने २० षटकअखेर २९७ धावांचा डोंगर उभारला आहे. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली होती. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर संजू सॅमसनने सूर्यकुमार यादवसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात दमदार कमबॅक केलं. यासह त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. तो १११ धावा करत माघारी परतला.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ७५ धावांची विस्फोटक खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रियान परागने १३ चेंडूंचा सामना करत ३४ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्याने अवघ्या १८ चेंडूतच ४७ धावा चोपल्या. यादरम्यान भारतीय संघाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. भारतीय फलंदाजांनी २२ षटकार आणि २७ चौकार खेचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT