ind vs ban twitter
Sports

IND vs BAN 3rd T20I: भारत- बांगलादेश सामना रद्द होणार? समोर आलं टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं कारण

India vs Bangladesh 3rd T20I Weather Update: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 3rd T20I Weather Update: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारती संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजी करताना बाजी मारली आहे. मालिकेतील तिसरा सामना हैदराबादमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापू्र्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

शेवटच्या सामन्यात पाऊस पडणार?

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. अॅक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये सकाळच्या वेळी पाऊस पडण्याचा अंदाज हा ४० टक्के इतका नोंदवण्यात आला होता. तर सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही २५ टक्के इतकी असणार आहे. मात्र सामन्यावेळी ढगाळ वातावरण असू शकते. जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर भारतीय संघाला बांगलादेशचा ३-० ने सुपडा साफ करता येणार नाही.

नितीश कुमार रेड्डी होम ग्राऊंडवर खेळणार

या मालिकेतील पहिल्या सामन्यात मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डीला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात नितीशला फार कमी चेंडू खेळण्याची संधी मिळाली. मात्र मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने ७४ धावांची शानदार खेळी केली.

या सामन्यात त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आता मालिकेतील तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. हे नितीशचं होम ग्राऊंड आहे. आयपीएल स्पर्धेतही तो सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आज त्याला आपल्या लोकांसमोर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. हैदराबादचा लोकल बॉय या सामन्यात कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयांक यादव/ हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT