team india twitter
क्रीडा

IND vs BAN: कानपूर कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार! हा स्टार खेळाडू करु शकतो पदार्पण

Ankush Dhavre

Team India Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

हा सामना होताच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र पहिला सामना एकतर्फी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होऊ शकतो.

टीम इंडियासाठी निर्णायक सामना

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील स्थान आणखी बळकट होणार आहे.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत रोहितने ३ वेगवान गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं होतं. मात्र कानपूरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमणात बदल पाहायला मिळू शकतात.

सिराजला विश्रांती मिळणार?

या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी मोहम्मद सिराजचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या सामन्यात तो आपली छाप सोडू शकला नाही. या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. जर रोहित कानपूरच्या खेळपट्टीवर ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार असेल, तर मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र जर रोहित या सामन्यातही ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार असेल, तर सिराजला विश्रांती देऊन यश दयालला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांचा भाजपच्या कार्यकर्ता संवाद, बैठकीला नेत्यांची उपस्थिती

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

Diabetes Symptoms : डायबिटीजमुळे आंधळे व्हाल? धूम्रपान, पथ्य न पाळणाऱ्यांना अधिक धोका?

Akshay Shinde Encounter : बदलापूरचा अर्धवट बदला? चाईल्ड पोर्नोग्राफीचं रॅकेट चालवणारा संस्थाचालक मोकाट?

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन तापलं! बीडहून जालना, संभाजीनगरला जाणाऱ्या बस सेवा बंद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT