team india twitter
Sports

IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीत पावसाची जोरदार बॅटिंग! पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकातच संपला; पाहा Scorecard

India vs Bangladesh 2nd Test, Stumps: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार कानपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सामन्यात पावसाची इनकमिंग आणि आऊट गोइंग सुरु असल्याने सामन्यातील पहिला दिवस ३५ षटकात संपला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाने आतापर्यंत ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय घेणारा रोहित शर्मा पहिलाच कर्णधार ठरला आहे. १९६४ नंतर पहिल्यांदाच कुठल्या कर्णधाराने कानपूरच्या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाला आकाश दीपने सुरुवातीलाच २ मोठे धक्के दिले.

सलामीला फलंदाजीसाठी आलेला जाकीर हसन खाते ही न उघडता माघारी परतला. त्यानंतर शदनम इस्लाम २४ धावा करत माघारी परतला. या दोन्ही फलंदाजांना आकाश दीपने बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बांगलादेशचा डाव सांभाळला. त्याने ३१ धावांची खेळी केली. मात्र आर अश्विनने त्याच्या या खेळीला ब्रेक लावला. शांतो ३१ धावा करत माघारी परतला. तर मोमिनूल हक ४० धावांवर आणि मुश्फिकुर रहिम ६ धावांवर नाबाद आहे.

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर रोहितने आतापर्यंत ४ गोलंदाजांचा वापर केला आहे. त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीपला गोलंदाजीची संधी दिली. यादरम्यान भारताकडून आकाश दीपने २ आणि आर अश्विनने १ गडी बाद केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT