kanpur cricket ground twitter
क्रीडा

IND vs BAN 2nd Test: पावसाचा खेळ चाले... एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा समारोप, चाहत्यांच्या आशेवर पाणी!

India vs Bangladesh 2nd Test Day 2: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवसही पावसामुळे धुतला गेला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील सलग दुसरा दिवस पावसामुळे धुतला गेला आहे. पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना अशी आशा होती की, दुसऱ्या दिवशी अॅक्शनपॅक सामना पाहायला मिळेल. मात्र असं काहीच झालेलं नाही. दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेलेला नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु न होताच समाप्त करण्यात आला आहे.

या सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना उशिराने सुरु झाला. त्यानंतर भारताने नाणेफेक जिंकला आणि बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकअखेर ३ गडी बाद १०७ धावा केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पाऊस काही थांबता थांबत नव्हता. त्यामुळे २ तासाआधीच पहिल्या दिवसाच्या खेळाचा समारोप करण्यात आला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम ६ तर मोमिनुल हक ४० धावांवर नाबाद आहे. या दोघांना दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येण्याची संधी मिळालेली नाही.

पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय

या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने २८० धावांनी बाजी मारली होती. भारतीय संघाने बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी ५१५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव अवघ्या २३४ धावांवर आटोपला होता. या शानदार विजयासह भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT