ind vs aus twitter
Sports

IND vs AUS Record: भारत- ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये भिडणार? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

India vs Australia Head To Head Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड ?

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये जाणारे चारही संघ ठरले आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

यासह भारतीय संघाकडे आयसीसीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची देखील संधी असणार आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीत कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ २००० मध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २० धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर २००९ मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा रेकॉर्ड पाहिला, तर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा संघ ऑस्ट्रेलियावर नेहमीच भारी पडला आहे.

ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे, मात्र दुसरी बाजू पाहिली, तर दोन्ही संघ वनडे क्रिकेटमध्ये एकूण १५१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ८४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर भारतीय संघाला ५७ सामने जिंकता आले आहेत.

भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये

वनडे रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघापेक्षा खूप पुढे आहे. पण, या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत.

पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचाही ६ गडी राखून पराभव केला होता. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला.

तर ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध झालेला सामना पावसामुळे धुतला गेल. हे दोन्ही सामने रद्द होऊनही ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT