india vs australia weather update ind vs aus 3rd odi rajkot weather today cricket news in marathi  saam Tv
Sports

IND vs AUS, Weather Update: राजकोट वनडे सामना पावसामुळे धुतला जाणार? पाहा कसं असेल हवामान

IND vs AUS 3rd ODI, Weather Update: वाचा सामन्यावेळी कसं असेल हवामान

Ankush Dhavre

IND vs AUS, Weather Update:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. २-० ने पिछाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल हवामान.

मालिकेतील तिसरा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यावेळी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केव्हा, कुठे आणि कधी रंगणार सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना तुम्ही स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहू शकता. यासह जियो सिनेमावर देखील हा सामना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. (Latest sports updates)

या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी विजय मिळवत,मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या दोन्ही विजयांसह भारतीय संघाने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT