Border Gavaskar Trophy: भारतीय अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये २ अनधिकृत कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय अ संघातील खेळाडू मायदेशी परतणार आहेत.
दरम्यान बीसीसीआयने या संघातील स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कलला ऑस्ट्रेलियातच थांबायला सांगितलं आहे. देवदत्त पडिक्कलची आउट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती.
मात्र आता त्याला ऑस्ट्रेलियात थांबायला सांगितलं आहे. त्याचा बॅकअप खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे.
देवदत्त पडिक्कलला ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेत मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र तरीही त्याचा या संघात बॅकअप खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. याचं एकमेव कारण म्हणजे, संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे.
सराव करताना शुभमन गिल, केएल राहुल दुखापतग्रस्त झाले होते. तर कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. केएल राहुल आता दुखापतीतून सावरून पुन्हा फलंदाजीला आला. मात्र तरीही तो खेळणार की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे देवदत्त पडिक्कलचा बॅकअप खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.
भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र आता तो दुखापतीतून सावरून मैदानात परतला आहे. शमीने रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ७ गडी बाद केले.
या दमदार कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र बीसीसीआयने स्पष्ट केलंय की, शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी काही सामने खेळावे.
शमी बंगालकडून आणखी काही सामने खेळताना दिसून येऊ शकतो. काही दिवसांनंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होणार आहे. या स्पर्धेतही शमी बंगालकडून खेळताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे शमीला भारताकडून कमबॅक करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.