india vs australia pitch report google
क्रीडा

IND vs AUS : गोलंदाज धुमाकूळ घालणार की फलंदाज करणार राडा?; टॉस जिंकून कोणत्या निर्णयानं होणार फायदा? वाचा पिच रिपोर्ट

Ankush Dhavre

India vs Australia, Narendra Modi Stadium Pitch Report:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा थरार येत्या १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वी अहमदाबादच्या खेळपट्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की फलंदाजांची चांदी? जाणून घ्या वर्ल्डकप फायनलचा पिच रिपोर्ट.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या सरासरी २६० इतकी राहीली आहे.

क्रिकेटचे जाणकार सांगतात की, सुरुवातीच्या १० षटकात या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेऊ शकतो. त्यानंतर विकेट स्लो होऊ शकतो. या खेळपट्टीवर सुरुवातीच्या षटकात वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल तर मधल्या षटकात फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.

खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असली तरी फिरकी गोलंदाजांचे थांबून येणारे चेंडू फलंदाजांच्या अडचणीत वाढ करु शकतात.

काय सांगतात आकडे?

गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर ३ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातही टॉस अतिशय महत्वाचा ठरणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत या मैदानावर ४ सामने खेळवले गेले आहेत. या ४ पैकी ३ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. (Latest sports updates)

हे मैदान मोठं असल्याने फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना विचार करुन मोठे फटके खेळावे लागणार आहेत. २० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत हे दोन्ही संघ १३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ८ तर भारतीय संघाने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT