India vs Australia ODI Series
India vs Australia ODI Series File Photo
क्रीडा | IPL

Ind vs Aus ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा दणका, कॅप्टनच बदलला

Nandkumar Joshi

India vs Australia ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. भारतानं ही मालिका २-१ ने जिंकली. आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारताविरोधातील वनडे मालिका सुरू होण्याआधीच मोठा दणका मिळाला आहे. (Latest Marathi News)

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (Test Cricket) संघाची कर्णधारपदाची धुरा पॅट कमिन्सकडे देण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा दौरा अर्धवट सोडून कमिन्स मायदेशी परतला. त्यानंतर संघाची धुरा स्टिव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली.

आता वनडे मालिकेसाठी (ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व स्मिथकडेच कायम राहणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही वनडे मालिकेसाठी पॅट कमिन्स भारतात येणार नाही, असे सांगितले आहे. (Cricket News)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात वनडे मालिका १७ मार्चपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा दिल्ली कसोटीनंतर आईच्या देखभालीसाठी मायदेशी परतला होता. गेल्याच आठवड्यात कमिन्सच्या आईचं निधन झालं.

त्यामुळे तो पुन्हा भारतात कसोटीसाठी परतला नाही. पॅट पुढील सामन्यांसाठी भारतात येऊ शकणार नाही. पॅट आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, तो कठीण प्रसंगातून जात आहे, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडॉनल्ड म्हणाले होते.

पॅट कमिन्स वनडे मालिकेसाठी भारतात येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्टिव्ह स्मिथकडेच वनडे संघाची धुरा राहणार आहे. मागील वर्षी फिंच याने निवृत्ती घेतल्यानंतर पॅट कमिन्सने वनडे संघाची धुरा सांभाळली होती. पण त्याने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक

पहिला सामना- १७ मार्च - शुक्रवार, मुंबई

दुसरा सामना - १९ मार्च- रविवार- विशाखापट्टणम

तिसरा सामना - २२ मार्च, बुधवार, चेन्नई

ऑस्ट्रेलिया संघ -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन एबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

SCROLL FOR NEXT