IND vs AUS T20 match  saam tv
Sports

IND vs AUS T20 match : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात; 'ही' आहेत टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणे

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ दाखवत विजयाला गवसणी घातली. टीम इंडियाला या ५ कारणामुळे पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

Vishal Gangurde

IND vs AUS T20 match : IND vs AUS T20 match : भारताची (India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याची टी२० मालिका सुरू झाली असून पहिला सामना मोहालीमध्ये झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने धावांचा मोठा डोंगर उभारला. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान दिलं . मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ दाखवत विजयाला गवसणी घातली. तर टीम इंडियाला पहिल्या सामन्यात या ५ कारणामुळे पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

भारताने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली. मात्र, भारतीय गोलंदाजानी फिंचला २२ धावावर बाद केले. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला घेरण्याचा प्रयत्न केला. स्मिथ (३५) आणि मॅक्सवेल (१) यांनाही स्वस्तात माघारी परतवलं. मात्र, १२ आणि १७ व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपुढे भारताचे गोलंदाज ढेपाळले. सुमार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगल्या धावा कुटत धावसंख्या लक्ष्याजवळ आणली. भारतीय खेळाडूंनी सामन्यात क्षेत्ररक्षण खराब केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत भर पडली. रोहित शर्माने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय देखील चुकीचे ठरले. गोलंदाज अक्षरने विकेट घेतल्यानंतर चहलला गोलंदाजी न देता वेगवान गोलंदाजाला दिली. रोहितचा हा निर्णय देखील पराभवाला काहीसा कारणीभूत ठरला.

भारताने २०८ धावांचा डोंगर उभा केल्यानं टीम इंडियामध्ये आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कमकुवत समजलं. तसेच डेथ ओव्हरला देखील भारताला मोठं अपयश आलं. रोहितने १९ वे षटक भुवनेश्वर कुमारला दिले. या षटकात ऑस्ट्रेलियाने १६ धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात २ धावा जिंकण्यासाठी शिल्लक राहिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आरामात सामना खिशात टाकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT