भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला.. गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. यासह ही मालिका भारतीय संघाने ३-१ ने गमावली. दरम्यान काय आहेत मालिका गमावण्याची प्रमुख कारणं? जाणून घ्या.
भारतीय संघाच्या मालिका पराभवाची प्रमुख कारणं Reason behind team india loosing border gavaskar trophy
फलंदाजांचा फ्लॉप शो
या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून जयस्वाल आणि नितीश रेड्डीला सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मैदानावर टीचून फलंदाजी करताना आलेली नाही. संघात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे अनुभवी फलंदाज असतानाही भारतीय संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. हे भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे.
भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांची या मालिकेतील कामगिरी
रोहित शर्मा - ३१ धावा
यशस्वी जयस्वाल - ३९१ धावा
केएल राहुल - २७६ धावा
विराट कोहली - १९० धावा
शुभमन गिल - ९३ धावा
नितीश रेड्डी - २९८ धावा
रिषभ पंत -२७६ धावा
रोहित शर्माचं नेतृत्व
रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळताना दिसून आला नव्हता. त्यावेळी जसप्रीत बुमराह कर्णधाराच्या भूमिकेत होता. हा सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर पुढील ३ पैकी १ सामन्यात भारताने विजय मिळवला, तर २ सामने ड्रॉ राहिले. शेवटच्या कसोटीत त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची जबाबदारी आली.
टॉप ऑर्डर
ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी संघाला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे खालच्या फळीत फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांना एक बेस मिळाला. याउलट भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी परतताना दिसून आले.
याचा फटका म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांना नवीन चेंडूचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराट तशी कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण मालिकेत तो ऑफ साईडच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताना बाद झाला.
या संपूर्ण मालिकेत भारताकडून एकटा जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाला भिडला. या संपूर्ण मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवली. या मालिकेत त्याने ३२ गडी बाद केले. जे यापूर्वी कोणीच केलं नव्हतं. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही.
या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी फलंदाजांची कमतरता स्पष्टपणे जाणवली. हे दोघेही मधल्या फळीत फलंदाजी करताना क्रिझवर थांबून वेळ घालवायचे.
त्यामुळे गोलंदाजांवर प्रेशर यायचा. मात्र या संपूर्ण मालिकेत कुठल्याही भारतीय फलंदाजाने २ सेशन टिकून फलंदाजी केलेली नाही. यासह मोहम्मद शमीचीही कमतरता जाणवली. कारण जसप्रीत बुमराहला मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हवी तशी साथ देऊ शकले नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.