भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी२० सामना आज ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.
भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी होबार्टमधील विजयी संघासह मैदानात उतरवेल
ट्रेव्हिस हेड आणि सीन एबॉट संघाबाहेर असून, ग्लेन मॅक्सवेलला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज आहे.
IND vs AUS 4th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज ओव्हलवर चौथा टी२० सामना रंगणार आहे. दुपारी पावने दोन वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पाच सामन्याची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. कॅनबरामध्ये झालेला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार विकेटने बाजी मारली. होबार्टमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाच विकेटने विजय मिळवत हिशोब चुकता केला होता. आज मालिकेतील निर्णायक सामना होणार आहे. (India vs Australia T20 series 2025 match preview Oval ground)
भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता धुसूरच आहे. होबार्टमधील विजयी संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातून ट्रेव्हिस हेड आणि सीन एबॉट संघाबाहेर असतील. कारण, हेड अशेस मालिकेसाच्या तयारीसाठी खेळणार नाही. ग्लेन मॅक्सवेल याला आज प्लेईंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
ओव्हेलच्या मैदानावर भारतीय विराट कोहली आणि धोनी या माजी कर्णधाराची परंपरा कायम राखण्यासाठी उतरेल. या मैदानावर भारतीय संघाचा विजयाच रेकॉर्ड चांगलाय. २०१२ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात मालिका बरोबरीत सोडली होती. ५ सामन्याची टी२० मालिका भारत २००८ मध्ये ऑस्ट्रेलियात हरला होता. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता. २०१८ मध्ये विराट कोहलीने मालिका १-१ बरोबरीत सोडली होती. तर २०२० मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने कांगारूचा २-१ ने पराभव केला होता. आता विराट-धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सूर्या मालिका विजयासाठी मैदानात उतरेल.
भारताची प्लेईंग ११ कशी असेल ?
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११ कशी असेल ?
मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिश (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल,मिचेल ओवेन, नॅथन एलिस, जेव्हियर बार्टलेट, मॅथ्यू कुह्नमन, बेन ड्वार्शुइस
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.