India Probable Playing XI 2nd T20
India Probable Playing XI 2nd T20 Saam TV
क्रीडा | IPL

IND vs AUS : दुसऱ्या टी-२० सामन्यांत भारतीय संघात होणार बदल; अशी असू शकते 'प्लेईंग ११'

Satish Daud-Patil

IND vs AUS 2nd T20 Match Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी (23 ऑक्टोबर) नागपुरात (Nagpur) खेळवला जाईल. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय (Team India) संघाचा 4 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता उर्वरीत दोन्हीही सामने भारतासाठी सामने बाद फेरीसारखे आहेत. दुसऱ्या T20 साठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल होऊ शकतात.

आगामी T20 विश्वचषकापूर्वी आपली सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हन शोधण्यासाठी टीम इंडियाकडे आता फक्त 5 सामने शिल्लक आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे बुमराह मोहाली टी-20 सामन्यात खेळू शकला नाही.

बुमराहच्या पुनरागमनामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवला बाहेर बसवलं जाईल. मोहालीच्या सामन्यात तब्बल 43 महिन्यांनंतर T20 आंतरराष्ट्रीय मैदानात उतरलेला उमेश फारसा प्रभाव सोडू शकला नाही. त्याने 2 षटकात 27 धावा देत 2 गडी बाद केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासली होती. मोहालीच्या सामन्यांत अक्षर पटेल हा भारताचा एकमेव गोलंदाज होता, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. याशिवाय, सर्व गोलंदाजांनी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी धावा 10 धावा खर्च केल्या होत्या.

जसप्रीत बुमराह जितक्या लवकर प्लेईंग इलेव्हनमध्ये परतेल, त्याचा भारतीय संघाला फायदा होईल. याशिवाय दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बुमराहला टी-20 विश्वचषकापूर्वी आपल्या लयीत येण्यासाठी वेळही मिळेल. लेगस्पिनर युझवेंद्र चहलने पहिल्या टी-20 सामन्यात 3.2 षटकात 42 धावा दिल्या. जरी त्याला यश मिळाले. चहलऐवजी रविचंद्रन अश्विनला दुसऱ्या सामन्यांत संधी मिळू शकते.

अशी असू शकते प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल जसप्रीत बुमराह .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT