virat kohli twitter
Sports

IND vs AUS 1st Test Day 3: यशस्वी- विराटनंतर, बुमराह चमकला! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

India vs Australia 1st Test Day 3 Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Ankush Dhavre

India vs Australia 1st Test Day 3: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यापासून ७ विकेट्स दूर आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी ५३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला ३ गडी बाद १२ धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी अजूनही ५२२ धावा करायच्या आहेत. तर भारतीय संघाला ७ विकेट्स काढायच्या आहेत.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ३ मोठे धक्के

भारतीय संघाने या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ६ गडी बाद ४८७ धावांवर डाव घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना बुमराहने सुरुवातीलाच मोठा धक्का दिला.

मॅकस्विनी शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सिराजने कमिन्सला माघारी धाडलं. त्यानंतर बुमराहने मार्नस लाबुशेनला ३ धावांवर पायचित करत माघारी धाडलं.

भारताने उभारला ४८७ धावांचा डोंगर

भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांवर हाणून पाडला. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेत भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केलं.

भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने २०१ धावांची भागीदारी केली. राहुलने ७७ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने १६१ धावांची खेळी केली. शेवटी विराटने नाबाद १०० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४८७ धावांवर पोहोचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT